esakal | गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना मिळालीय 'ही' नविन जबाबदारीत... 
sakal

बोलून बातमी शोधा

satej patil

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने आज जिल्हानिहाय पालकमंत्री व संपर्कमंत्री यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सतेज पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना मिळालीय 'ही' नविन जबाबदारीत... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडील जबाबदारीत आज आणखी वाढ झाली आहे . 
 कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या सतेज पाटील यांच्याकडे आता सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तीन जिल्ह्यातील संपर्कमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

वाचा - विषय हार्ड तर ; उडव की मग हवेत बार...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने आज जिल्हानिहाय पालकमंत्री व संपर्कमंत्री यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सतेज पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.काॅग्रेसच्या पक्षीय वाटचालीत वाढ व्हावी,तसेच पक्ष बळकटीवर काम करण्यासाठी या निवडी झाल्या आहे. या मध्ये सतेज पाटील यांच्याकडे सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्याची विशेष जबाबदारी पक्षश्रेष्ठीनी दिली आहे.