अलगीकरण तरुणांकडून "शाळेची सेवा' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

तमनाकवाडा (ता. कागल) येथे मुंबईहून आलेल्या तरुणांना गावच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीत अलगीकरणासाठी ठेवले आहे. वेळेचा सदुपयोग करत त्यांनी स्वतःची काळजी घेत क्रीडांगणाची स्वच्छता, रोपांची निगा आणि इमारत व परिसर चकाचक केला आहे. निर्जंतुकी करणासाठी औषध फवारणी देखील तेच करत आहे. 

सेनापती कापशी : तमनाकवाडा (ता. कागल) येथे मुंबईहून आलेल्या तरुणांना गावच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीत अलगीकरणासाठी ठेवले आहे. वेळेचा सदुपयोग करत त्यांनी स्वतःची काळजी घेत क्रीडांगणाची स्वच्छता, रोपांची निगा आणि इमारत व परिसर चकाचक केला आहे. निर्जंतुकी करणासाठी औषध फवारणी देखील तेच करत आहे. 

अत्यंत अडचणीच्या कोरोना संसर्गाच्या धोक्‍यातून गावात आल्यावर या तरुण आणि कुटूंबियांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. गावच्या मध्यवस्तीत ही शाळा इमारत आहे. त्यामुळे धोका नको म्हणून काहींनी विरोध दर्शविला, मात्र तो निवळलाही. अपुऱ्या सुधातही त्यांनी संयमाने घेत मिळालेला वेळ 25 वर्षाच्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत श्रमदान सुरू केले आहे.

स्वच्छता आणि परिसरातील वृक्षांची निगा त्यांनी सुरू ठेवली आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी इमारत आणि परिसरात दिवसातून दोन वेळा औषध फवारणी करून आपला "अलगीकरणाचा' वेळ व्यतीत करत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्याबरोबरच शाळाही चकाचक होत आहे. सरपंच दत्तात्रय चव्हाण, ग्रामसेविका वासंती मगर, हरी तिप्पे, श्रीकांत कांबळे, दयानंद साळवी आणि ग्रामस्थही सहकार्य करत आहेत. 

आपल्यामुळे इतरांना धोका होणार नाही याची काळजी घेत त्यांनी स्वतःला गेटच्या आत बंद करून घेतले आहे. 14 दिवसाच्या अलगीकरण कालावधी नंतरही आणखी काही दिवस येथेच राहू. असेही त्यांनी कोरोना नियंत्रण समितीला सांगितले आहे. शाळेची सेवा करण्याची संधी मिळाल्याच्या प्रतिक्रिया ते व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी त्यांना साहित्य पुरवले आहे. संतोष मशाळकर, राजू कसलकर, मंगेश कोकितकर, निलेश कोकितकर, विश्वनाथ तिप्पे, राहूल ढोकरे, आदींनी पुढाकार घेतला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'School service' by segregated youth