
कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळा मार्चमध्येच बंद झाल्या. वार्षिक परीक्षाही रद्द झाल्या. दरवर्षी जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षावरही अद्याप अनिश्चीततेचे सावट आहे. जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या मध्यावर शाळा सुरू होतील असा अंदाज व्यक्त होत असला तरी प्रत्यक्षात जोपर्यंत शासन निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत शाळेची घंटा वाजणार नाही. या सर्वाचा परिणाम पुढील शैक्षणिक वर्षावर होणार असून, अवघ्या आठ महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे.
शालेय विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी शाळांमध्येच क्वारंटाईन विभागही सुरू केले आहेत. या सर्वांमुळे शाळा सुरू होण्यास विलंबच होईल असे दिसते. दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अवघे आठ महिने मिळतील. त्यातही सार्वजिनक सुट्ट्या वगळल्या तर हे दिवस आणखी कमी होतात.या निमित्ताने ऑनलाईन शिक्षण, रचनात्मक ज्ञानवाद, कृतीयुक्त शिक्षण हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत.
प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्यांना कोरोनाचा प्रार्दुभाव होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका अधिक आहे. अशा काळात आरोग्याला महत्त्व देणे गरजेचे आहे. शाळा उशिरा सुरू झाल्या तर जादा तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करू. पण शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतचा कोणताही धोका पत्करू नये.
- राजेश वरक, कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ)
पुढचे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होणार आहे. वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शासानाने सार्वजनिक सुट्ट्या कमी कराव्यात.
- काकासाहेब भोकरे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती
शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होण्याचा फटका दहावीच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण यंदा मेमधील त्यांचे उन्हाळी वर्ग होणार नाहीत. त्यात शाळा उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. यासाठी पुढील वर्षाची दहावीची परीक्षा मे मध्ये घ्यावी.
- दत्ता पाटील, जिल्हा सचिव, मुख्याध्यापक संघ
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या मानसिकतेत खंड पडणार नाही अशी शैक्षणिक वर्षाची रचना असते. यंदा चार-पाच महिन्यांचा खंड पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा अध्ययन, उजळणीसाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर असेल.
- संभाजी बापट, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
बहुतांशी पालकांकडे अँड्राईड फोन नाही. असेल तर त्यांच्याकडे पुरेसा डाटा नाही. त्यामुळे ऑनलाईन शिकवणे आणि शिकणे हे जटील आहे. शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये अध्यायन करणे क्रमप्राप्तच आहे.
- एस. के. पाटील, जिल्हाध्यक्ष, पुरोगामी शिक्षक संघटनाशाळा उशिरा सुरू होणार आहेत. त्यामुळे शासनाकडून मिळणारे शैक्षणिक साहित्य कधी उपलब्ध होईल याची खात्री नाही. याचा सर्वात मोठा फटका शासकीय शाळेत जाणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे.
- सुधाकर सावंत, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती)
दृष्टीक्षेप
विद्यार्थी संख्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.