महापालिका क्षेत्रात सोमवारपासून शाळा सुरू ः 65 शाळांचे निर्जंतुकीकरण

डॅनिअल काळे
Saturday, 21 November 2020

कोल्हापूर,: येत्या सोमवार (ता. 23)पासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत शहरातील 370 शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली. सुमारे 65 शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, उर्वरित शिक्षकांची तपासणी, शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. 

सोमवारी शहरातील 112 शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या शाळांमधील एक हजार 195 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचीही कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेची शहरातील 11 नागरी आरोग्य केंद्रे व आयसोलेशन हॉस्पिटलसह 12 ठिकाणी कोरोना चाचणीची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली. 22 नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांची चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. या सर्व शाळा आणि परिसराचे निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे कामही गतीने सुरू आहे. 
शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध द्यावी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी करणे, वर्गनिहाय पालक समितीची बैठक घेणे, शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरात किमान सहा फूट शारीरिक अंतर ठेवणे, यासाठी चौकोन अथवा वर्तुळ तयार करणे, सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कायम मास्कचा वापर करण्याबरोबरच त्यांची रोज ऑक्‍सिजन व तापाची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

पालकांनी दक्षता घ्यावी 
याबाबत प्रशासन अधिकाऱ्यांनी सर्व मुख्याध्यापकांना व्हीसीद्वारे मार्गदर्शन केले. शाळा सुरू करण्यासाठी कार्यवाही गतीने सुरू केली. तसेच, पालकांनी मुलांना योग्य दक्षता घेऊन न घाबरता शाळेत पाठवावे, असे आवाहनही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. 

-- संपादन - यशवंत केसरकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools start from Monday in the municipal area