‘माध्यमिक’चे वर्ग ठरल्यानुसारच; अमन मित्तल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

अमन मित्तल; शाळांत थर्मल स्कॅनिंगसह, ऑक्‍सिमीटर तपासणी

कोल्हापूर: राज्य शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून (ता. २३) सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांप्रमाणेच जिल्ह्यातील वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी आज येथे दिली. मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय डिसेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलला आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. मित्तल यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘शाळा सुरू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या असल्या तरी जिल्हा प्रशासनावर याबाबतची जबाबदारी दिली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आहेत. परिस्थिती आटोक्‍यात असल्याने चिंता करण्याचे काही कारण नाही. कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, तर याबाबतचा फेरविचार करण्यात येईल; मात्र सध्या अशी काही परिस्थिती नसल्याने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार आहेत.’’

हेही वाचा- तरुणांनो सावधान : काही  मिनिटातच खात्यावरून पैसे होतायत गायब -

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील शाळा सुरू होत असताना अनेक उपाययोजना राबवत आहेत. माध्यमिक शाळेतील शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करणे, शाळेत थर्मल स्कॅनिंग व ऑक्‍सिमीटरचा वापर केला जाणार आहे. शासनाने सुचविलेल्या सर्व उपाययोजनांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे.’’

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Secondary school now started information by Zilla Parishad Chief Executive Officer Aman Mittal