जप्त केलेली वाहने आजपासून परत करणार 

 Seized vehicles will be returned from today
Seized vehicles will be returned from today
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) ः लॉकडाऊन काळात विनाकारण फेरफटका मारत इचलकरंजीसह हुपरी व कुरुंदवाड येथे फिरणाऱ्या वाहनधारकांची सुमारे 2 हजार 923 वाहने जप्त केली. ही वाहने उद्या (ता. 12) पासून दंडात्मक कारवाई करून परत दिली जाणार आहेत. ही मोहिम 21 मेपर्यंत सुरु राहणार असून पोलिस ठाण्यात स्वतंत्र कक्ष आहेत. वाहने सकाळी 8 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायंकाळी 7 या दोन सत्रात परत केली जाणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन पुकारला. या काळात विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर फिरणे, क्षुल्लक कामासाठी वाहने घेऊन लांबपर्यंत जाणे, अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली बोगस स्टिकर लावून फिरणे असे प्रकार घडले आहेत. वारंवार सूचना करूनही वाहनधारकांत फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी थेट दंडात्मक कारवाईबरोबरच वाहन जप्तीची मोहिम सुरु केली.

शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने 1826, शिवाजीनगर 308, गावभाग 367 आणि शहापूर 242, हुपरी पोलिसांनी 115 व कुरुंदवाड पोलिसांनी 65 अशा एकूण 2923 वाहनांवर कारवाई केली आहे. दुचाकीवरुन विनाकारण फिरणाऱ्यांना चांगला ब्रेक लागला तर अत्यावश्‍यक सेवेच्या काही वाहनांवरही दंडात्मक कारवाई केली.

कारवाईत जप्त केलेली वाहने प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या परिसरात आहेत. ही वाहने परत करण्यासाठी पोलिसांकडून 12 ते 21 मे दरम्यान मोहिम राबवण्यात येणार आहे. शहरातील तिन्ही पोलिस ठाणे तसेच शहर वाहतूक शाखा अंतर्गत कागदपत्रांची तपासणी व दंडाच्या आकारणीनंतर वाहने परत केली जाणार आहे. गावभाग, शिवाजीनगर व शहापूर पोलिस ठाण्याती वाहने त्या-त्या पोलिस ठाण्यातून मिळणार असून शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात कक्ष उभारला आहे. 

कागदपत्रे आवश्‍यक 
गर्दी टाळण्यासाठी सकाळी 8 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायंकाळी 7 या दोन सत्रात वाहने परत केली जाणार आहेत. वाहने परत करताना नियमानुसार क्रेनचे भाडे 100 रुपये व 200 रुपये दंड याप्रमाणे 300 रुपये कराची आकारणी केली जाणार आहे. वाहन परत नेण्यासाठी अर्ज, हमीपत्र यासह आरसी बुक, आधारकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, विमा आदी कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com