कोल्हापुरात सात जणांकडून दहशत माजवत वाहनांची तोडफोड

seven youth in daulat nagar blash various vehicles in kolhapur report in hand of police
seven youth in daulat nagar blash various vehicles in kolhapur report in hand of police

कोल्हापूर : दौलतनगरात वाहनांची तोडफोड करून सात जणांनी दहशत माजवली. यात पाच वाहनांचे नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी घडलेल्या प्रकारामुळे परिसरात तवाणाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे : ऋषिकेश ऊर्फ सोन्या कुराडे, आनंद बबन एडगे, विशाल वसंत गायधडक, विपुल मलीक, रामू कलकुटकी, ओंकार, अमित दिंडे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, दौलतनगर दत्तवाडकर गल्लीत सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास काही तरुण घुसले. त्यांनी ओरडा करत रस्त्यावरील ठेवलेल्या बादल्या, बॅरेलवरील झाकण भिरकावून देण्यास सुरवात केली. त्यांना येथील महिलांनी अडविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र ते ऐकण्याच्या स्थितित नव्हते. त्यानी रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर निशाना साधला. दगडांसह हाताला लागेल त्या वस्तूने त्यांनी वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्यास सुरवात केली. 

वाहनांची सुरू असणाऱ्या तोडफोडीबाबत येथील गोपीचंद नलवडे यांनी जाब विचारला. त्यानी 'तुला काय करायचे' असे म्हणून त्यांनाच लाथाबुक्‍यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. भरदिवसा अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांत घबराट उडाली. त्यांनी मदतीसाठी ओरडा करण्यास सुरवात केली. नागरिकांचा हा पवित्रा पाहून ते तरूण तेथून पसार झाले. तोडफोडीत पाच वाहनांचे सुमारे 10 हजाराचे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद गोपीचंद नलवडे यांनी राजारामपुरी पोलिसात दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात दहशत माजविणारे संशयित ऋषिकेश ऊर्फ सोन्या, आनंद, विशाल, विपुल, रामू, ओंकार, अमित अशा सात जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक सिताराम डुबल करीत आहेत. 


वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घाला 

दौलतनगर परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचे प्रकार वारंवार घडतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे आणि भागात शांतता निर्माण करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com