टिमकी लागली घुमू : यंदा होळीच्या टिमकीला पुठ्ठ्यांचा साज

shimga festival wood is expensive we use cardboard kolhapur marathi news
shimga festival wood is expensive we use cardboard kolhapur marathi news
Updated on

कोल्हापूर : काही वर्षांपूर्वी टिमकी तयार करण्यासाठी लाकूड वापरले जायचे. टिमकीचा आवाज दणकून घुमायचा; मात्र टिमकीला लागणारे लाकूड मिळत नसून, ते महाग आहे. यासाठी पर्याय म्हणून प्लास्टिकचा वापर पुढे आला; पण टिमकीच्या ठेक्‍याचा आवाज घुमण्यासाठी चामड्याशिवाय पर्याय नाही. आज या चामड्याबरोबर विविध प्रकारच्या गोलाकार पुठ्ठ्यांपासून टिमकी तयार होत आहे. जेव्हा ही टिमकी बाजारात येते, तेव्हा आतमध्ये पुठ्ठा आहे, हे अनेकांना समजणारही नाही. अशा पद्धतीने ही टिमकी घुमते. उत्तर प्रदेशातील बाराबंकी (ता. फत्तेपूर) येथील टिमकी तयार करणारा तांडा तावडे हॉटेलच्या पुलाखाली आला असून, ते या टिमकीला साज देत आहेत. 

२८ मार्चला होळीचा सण आल्याने टिमकीची लगबग सुरू आहे.   गोकुळ शिरगाव अन्‌ शिरोली एमआयडीसीतील कारखान्यात स्टिल, आयर्न, रुळ, कागद, प्लास्टिक, अन्य मटेरियल आदीची ने-आण करण्यासाठी हा गोलाकार पुठ्ठा (रिम) वापरला जातो. हा पुठ्ठा कठीण असतो. तो वाकत नाही. उत्पादन केल्यानंतर पुठ्ठे टाकून दिले जातात. असा पुठ्ठा घेऊन आजूबाजूला तासून व्यवस्थित केला जातो. नंतर पातळ असे चामडे घेतले जाते आणि ते बसविण्यासाठी स्टिल गोलाकार धातूंची रिंग, मसाले, तासलेला बांबू, फेव्हिकॉल, बारीक दोऱ्या घेऊन टिमकी तयार होते. तत्पूर्वी पुठ्ठ्याला दिला जाणारा रंग धातूच्या रंगाचा असतो. 

पुठ्ठा वाळवल्यानंतर त्यावर दोन्ही बाजूला चामडे बसवतात. एक टिमकी तयार करण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. दिवसात १५ ते २० टिमक्‍या तयार होतात. या टिमक्‍या शहर परिसरात, उपनगरात, खेडेगावात घेऊन विक्री केली जाते. टिमकीच्या आवाजाने लहान मुलांसह अनेकांचे लक्ष वेधले जाते. टिमकी करण्यासाठी कसून मेहनत लागते. कच्चा माल लागतो. एक टिमकी सजविण्यासाठी  १० ते १५ जण विविध माल तयार करून देतात. नुसती टिमकीच नव्हे; तर दिमडी, छोटे ढोलही तयार केले जातात. तांड्यातील महिला ही टिमकी तयार करण्यासाठी मदत करतात.  

लाकूड महागल्यामुळे आम्ही पुठ्ठा वापरतो. दरवर्षी आम्ही होळीच्या आधी येतो. चार पैसे कुटुंबाला मिळतात. होळी झाली की, आम्ही तांडा घेऊन पुन्हा बाराबंकीकडे जातो.’’ 
-अंजान शेख, मुखिया, उत्तरप्रदेश.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com