
शिवाजी पेठेच्या मिरवणुकीला ऐतहासिक परंपरा आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते
कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन जे नियम व अटी घालून देईल त्यानुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय शिवाजी तरुण मंडळाच्या बैठकीत आज झाला. शिवाजी पेठेच्या वतीने दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने शिवजयंती कोणत्या पद्धतीने साजरी करायची याबाबत चर्चा झाली.
शिवाजी पेठेच्या मिरवणुकीला ऐतहासिक परंपरा आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते. उभा मारुती चौकात साजऱ्या होणाऱ्या उत्सवास लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देणगीदारांच्या मदतीतून उत्सव साजरा होतो. कोरानाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. गर्दी टाळा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उभा मारुती चौकापुरता उत्सव साजरा करायचा की मिरवणूक काढायची याबाबतचा निर्णय पुढील बैठकीत घेण्याचे ठरले. मंडळाच्या उत्सवाच्या तयारीस जानेवारीपासूनच सुरवात होते. पहिल्यांदाच कोरोनामुळे उत्सवाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
हे पण वाचा - भेट इंदिरा गांधींची; कोल्हापूरच्या नेत्यांच्या हिंदीनं सुटला धरणाचा प्रश्न
उत्सव साधेपणाने साजरा करू पण शिवजयंती परंपररा खंडीत होऊ द्यायची नाही यावरही चर्चा झाली. मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, महेश जाधव, रविकिरण इंगवले, अजित राऊत, सदाभाऊ शिर्के, चंद्रकांत यादव, सुरेश जरग, लाला गायकवाड, श्रीकांत भोसले, मोहन साळोखे आदी उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे