Coronavirus : विद्यापीठाने दिलीय सुट्टी पण तुम्ही करू शकता असा ऑनलाईन अभ्यास...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

विद्यापीठाच्या शिक्षकांना सध्याच्या "वर्क फ्रॉम होम'चे आवाहन करीत असताना विद्यापीठ प्रशासनाने मूक (मासिव्ह ऑनलाइन ओपन कोर्स) आणि मूडल (मॉड्युलर ऑब्जेक्‍ट ओरिएंटेड डायनॅमिक लर्निंग एन्व्हायर्नमेंट) या दोन ई-लर्निंग व्यासपीठांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्‍यकतेनुसार ऑनलाइन मार्गदर्शन करावे, त्यासाठी आवश्‍यक ते प्रेझेंटेशन, नोट्‌स वगैरे सामग्रीची निर्मिती करावी, असे आवाहन केले आहे.

कोल्हापूर - कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थी, शिक्षकांना 31 मार्चपर्यंत वर्गात एकत्र येऊन अध्यापन प्रक्रिया थांबविण्याची सूचना केली असली तरी विद्यापीठाच्या ऑनलाईन सेवा-सुविधांमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अध्ययन प्रक्रिया सुरू ठेवणे शक्‍य झाले आहे. विद्यापीठाने काही वर्षांत ऑनलाईन अभ्यासक्रम निर्मितीसह MOOC, MOODLE ऑनलाईन उपलब्ध व्यासपीठांचा ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरवात केली. वर्गामधील नियमित अध्यापनाला ऑनलाईन अध्ययनाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांना विषय समजावून घेणे व त्याचा सुनियोजितरित्या अभ्यास करणे शक्‍य झाले आहे. 

वाचा - कोल्हापुरात कुठे दिली जायची फाशीची शिक्षा ? वाचा कोणतं आहे ते ठिकाण.. 

MOOC,MOODLEचा वापर करण्याचे कुलगुरूंचे आवाहन. 

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाच्या शिक्षकांना सध्याच्या "वर्क फ्रॉम होम'चे आवाहन करीत असताना विद्यापीठ प्रशासनाने मूक (मासिव्ह ऑनलाइन ओपन कोर्स) आणि मूडल (मॉड्युलर ऑब्जेक्‍ट ओरिएंटेड डायनॅमिक लर्निंग एन्व्हायर्नमेंट) या दोन ई-लर्निंग व्यासपीठांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्‍यकतेनुसार ऑनलाइन मार्गदर्शन करावे, त्यासाठी आवश्‍यक ते प्रेझेंटेशन, नोट्‌स वगैरे सामग्रीची निर्मिती करावी, असे आवाहन केले आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत थेट अध्यापन करता येत नसले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची खबरदारी म्हणून ऑनलाइन व्यासपीठांचा मुबलक वापर करावा, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या. जे विद्यार्थी ऑनलाइन व्यासपीठांचा वापर करीत नसतील, त्यांनी सुद्धा मूक, मुडल या व्यासपीठांचा पुरेपूर वापर करून आपले शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी या लिंकचा करावा वापर...

 केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या "स्वयम'

(SWAYAM) या उपक्रमाची


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji University Study Process Online