शिवाजी विद्यापीठाचा अभ्यासक्रम अपूर्ण, तरी परीक्षेची घाई का? सिनेट सदस्यांचा सवाल

Shivaji University syllabus incomplete, but why hurry for the exam? Question from senators
Shivaji University syllabus incomplete, but why hurry for the exam? Question from senators
Updated on

कोल्हापूर ः महाविद्यालयातील 60 टक्के प्राध्यापक तासिका तत्वावरील (सीएचबी) आहेत. लॉकडाउनपासून ते महाविद्यालयात आले नाहीत. मग ऑनलाईन लेक्‍चर कोणी घेतले ? महाविद्यालये सुरू झाल्यापासून अध्यापनासाठी अवघे वीस दिवस मिळाले. अभ्यासक्रम पूर्ण नसताना विद्यापीठ परीक्षा घेण्याची घाई का करत आहे, असा प्रश्‍न अधिसभेचे सदस्य डॉ. सतीश घाटगे यांनी केला. विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात ही अधिसभा झाली. 
घाटगे म्हणाले,"प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने तेथे सीएचबीचे प्राध्यापक काम करतात. लॉकडाऊन सुरू होताच त्यांना महाविद्यालयाने काम थांबवण्यास सांगितले. 24 मार्च 2020 ते 25 फेब्रुवारी 2021 या कालावधीत सीएचबी प्राध्यापक महाविद्यालयात गेले नव्हते. त्यामुळे बहुतांशी महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन लेक्‍चर झालेली नाहीत. महाविद्यालये सुरू झाल्यापासून साप्ताहिक, सार्वजनिक सुटट्या वगळल्या तर अध्यापनासाठी अवघे 20 दिवस मिळाले आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसताना विद्यापीठ परीक्षेची गडबड का केली गेली.' 
परीक्षा विभाग नियंत्रक गजानन पळसे म्हणाले, "परीक्षांच्या नियोजनासाठी समिती नेमण्यात आली आहेत. यामध्ये सात प्राचार्य आहेत. त्यांच्या सुचनांच्या नुसारच परीक्षेचे वेळापत्रक ठरविले आहे.' 
यावेळी काही सदस्यांनी प्रश्‍नपत्रिकेबद्दल प्रश्‍न उपस्थित केले. महाविद्यालये सुरू होत असताना परीक्षा कशा प्रकारे घेणार याची कल्पना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिली असती तर तशा प्रकारे अध्यापन आणि अध्यायन करता आले असते. पण अचानक सांगितले की परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्‍नांची असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. असे त्यांनी सांगितले.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com