कोल्हापुरातील शिये गाव तीन दिवस शंभर टक्के लाॅकडाऊन 

Shiye village in Kolhapur three days  lock down
Shiye village in Kolhapur three days lock down

शिये(कोल्हापूर) : शिये ( ता.करवीर) येथील एक तरुण कोरना पॉझिटिव्ह आल्यामुळे शिये गाव भाग तीन दिवस लाॅकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण हा आॅपरेटर म्हणून काम करत होता. 


दोन दिवसापूर्वीच क्रशर विभागातील एक मजूर कोरणा पॉझिटीव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने क्रशर विभाग पाच दिवस पूर्णपणे बंद ठेवला होता. त्यातच गाव भागातील एक तरुण पॉझिटिव्ह आल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
ग्रामपंचायतीने गावभाग लॉकडाऊन केला आहे. तर गावभाग निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी त्या पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या सहा व्यक्तींना स्वॅब घेण्यासाठी सीपीआर हॉस्पिटलला पाठवले आहे.

कोरोना रूग्ण कोणाकोणाला भेटला ? सीसीटीव्ही फुटेजवरून समजणार 

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत कोरोना रुग्णाचा वावर झाल्याने तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील एक कर्मचारी बाधित झाल्याने गुरुवारी जिल्हा परिषदेत औषध फवारणी केली. सकाळी 9 वाजता विभाग, खातेप्रमुख, पदाधिकारी, पॅसेच या ठिकाणी ही औषध फवारणी केली. संबंधित व्यक्‍तीने कोणकोणत्या अधिकारी, पदाधिकारी, सदस्य व कर्मचाऱ्यांची भेट घेतली याची माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून घेण्याचे काम सुरु आहे. 

कोरोनाचा दिवसेंदिवस प्रसार होत आहे. ग्रामीण भागातही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा परिषदेत तर हजारोंच्या संख्येने लोक दररोज विविध कामासाठी येत असतात. जिल्हा परिषदेत आलेल्या अशाच एका अभ्यागतास कोरोना झाल्याने संपूर्ण जिल्हा परिषद हादरुन गेली आहे. संबंधित व्यक्‍ती जेवढ्या अधिकारी, पदाधिकारी, सदस्य व कर्मचाऱ्यांनी भेटली याची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जात आहे. यातच जिल्हा परिषदेच्या ग्रामसडक विभागातील एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कर्मचारी, अधिकारी हडबडून गेले आहेत. त्यामुळेच गुरुवारी जिल्हा परिषदेत औषध फवारणी करण्यात आली. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com