धक्कादायक ः सीपीआरच्या आवारात वृद्ध महिलेची परवड

बी. डी चेचर
Wednesday, 12 August 2020

कोल्हापूर ः कोरोनाबाधित रुग्ण गल्लोगल्ली आढळू लागले आहे. त्यामुळे उपचारासाठी सीपीआरमध्ये बेड उपलब्ध नाहीत, खासगी रूग्णालयात जाण्याची ऐपत नाही, अशा स्थितीला पेठ वडगाव येथून उपचारासाठी सीपीआर मध्ये आलेलेल्या वृध्द महिलेलाही सामोरे जावे लागले आहे. 

कोल्हापूर ः कोरोनाबाधित रुग्ण गल्लोगल्ली आढळू लागले आहे. त्यामुळे उपचारासाठी सीपीआरमध्ये बेड उपलब्ध नाहीत, खासगी रूग्णालयात जाण्याची ऐपत नाही, अशा स्थितीला पेठ वडगाव येथून उपचारासाठी सीपीआर मध्ये आलेलेल्या वृध्द महिलेलाही सामोरे जावे लागले आहे. 
सीपीआर आवारात वृध्द महिला ( विजयमाला आवळकर) आणि तिच्या उशाला बसलेला मुलगा ( प्रशांत आवळकर ) हे दृश्‍य आज येथे दिसले. त्यांची विचारपूस केली असता आईला धाप लागत असल्याची माहिती प्रशांतने दिली. तसेच आम्ही पेठवडगाव वरून आलोय. तेथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. म्हणून सीपीआराला आलो, मात्र गेले दोन तास इथं येऊन झाले. पण येथील डॉक्‍टर म्हणतात की, ऑक्‍सीजन नाही, आणि बेडही शिल्लक नाही. आता सांगा आम्ही काय करायचे ? असा प्रश्‍न प्रशांत याने केला. 
तो म्हणाला, ""आमची परिस्थिती बेताचीच आहे. बहीण सुजाता सीपीआर हॉस्पिटलमध्ये आईवर उपचार कसे होतील, याची विचारणा करण्यासाठी फिरत आहे. मात्र तिला गेले दीड-दोन तास उत्तर मिळत नाही.'' 
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बंटी सावंत यांना फोन करून येथे बोलवले. काही वेळात श्री. सावंत तिथे आले. त्यांनी थोडीफार व्यवस्था केली. मात्र शेवटी बेड मिळालाच नसल्याने आईला उपचारा अभावी थेट घरी जाण्याची वेळ आली. सीपीआर रूग्णालयात सद्या कोरोनावर उपचार होतात. इतर गंभीर आजारीना सेवा रूग्णालयात पाठवले जाते. मात्र अनेकदा ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तीना योग्य पध्दतीने माहिती मिळाली नाहीतर त्यांची फरपट होते. तर खासगी दवाखाने कुठे बंद तर कुठे पैशा शिवाय उपचार नाहीत, अशी स्थिती आहे. यातून अनेकांची गैरसोय होते. या वृध्द आजी सारखी अनेकांवर वेळ येते. त्यामुळे सीपीआरमध्ये येणाऱ्यांना किमान उपचाराला कोठे जावे, मोफत उपचार कोठे होतील, याची माहिती मिळणे अपेक्षीत आहे. 

-संपादन  ः यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Affordability of an elderly woman in the premises of CPR