
शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. बी. पाटील पुरस्कारांचे आज वितरण
कोल्हापूर : शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. बी. पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक यांना "शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 72 मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची निवड करण्यात आली. शनिवारी (ता. 16) न्यू कॉलेजच्या प्रागंणात दुपारी 2.30 वाजता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. अशी माहिती श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील शैक्षणिक विचारमंचातर्फे हे पुरस्कार देण्यात येतील. पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षपद ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भुषविणार आहेत. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच या समारंभात महाराष्ट्र विधानपरिषदेचे पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार जयंत आसगांवकर, पदवीधर मतदार संघाचे नुतन आमदार अरूण लाड यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.'
हेही वाचा- काळ आला होता पण वेळ आली नव्हती..!
यावेळी संस्थेचे चेअरमन आर. डी. पाटील - वडगावकर, सचिव आर. वाय. पाटील, एस. के. पाटील, रंगराव तोरस्कर, खंडेराव जगदाळे, बी. बी. पाटील, सी. एम. गायकवाड, सी. आर. गोडसे, उदय पाटील, समीर घोरपडे, संदीप पाटील, डी. जी. किल्लेदार आणि बी. एस. कांबळे उपस्थित होते.
संपादन- अर्चना बनगे