"ब्रिस्क'ला मुदतवाढीचा प्रश्‍नच येत नाही ः श्रीपतराव शिंदे

Shripatrao Shinde Said, Extension To Brisk Company Will Not Give Kolhapur Marathi News
Shripatrao Shinde Said, Extension To Brisk Company Will Not Give Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : सन 2013-14 पासून आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना ब्रिस्क कंपनी चालवित आहे. कंपनीला आम्ही कारखाना सोडा, असे म्हटलेले नाही. परंतु, करारानुसार अजून दोन हंगाम शिल्लक असतानाच कारखाना सोडत असल्याचे कंपनीने पत्र दिले आहे. यामुळे कंपनीला मुदतवाढ देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे स्पष्टीकरण कारखान्याचे अध्यक्ष ऍड. श्रीपतराव शिंदे यांनी सभासदाने विचारलेल्या लेखी प्रश्‍नाला उत्तर देताना दिले. 

कारखान्याची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन झाली. स्वयंवर सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या या सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. संचालक दिपकराव जाधव यांनी स्वागत केले. विषयपत्रिकेचे वाचन फायनान्स अकौटंट बी. आर. रेडेकर यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. 

ऍड. शिंदे म्हणाले, ""कारखान्याने यंदा तीन लाख 39 हजार 421 टन उसाचे गाळप केले. सरासरी 12.01 टक्के उताऱ्याने चार लाख 6 हजार 190 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. अर्कशाळेत 136 दिवसामध्ये 31 लाख 17 हजार 51 लिटर स्पिरीटचे उत्पादन केले आहे. यासाठी 11 हजार 649 मे. टन मळीचा वापर झाला. प्रति टन मळीला 267.57 इतका स्पिरीट उतारा आला आहे. आगामी हंगामात उत्पादकांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याला देवून सहकार्य करावे.'' 

या वेळी माजी संचालक शिवाजी खोत, चंद्रकांत बंदी, सुभाष पाटील, रणजित देसाई आदींनी लेखी प्रश्‍न विचारले होते. बंदी यांनी निवृत्त कामगारांच्या देणीबाबतचा प्रश्‍न विचारला होता. त्यावर ऍड. शिंदे यांनी कारखाना व कंपनीने अदा केलेल्या देय रक्कमेचा आढावा घेतला. या वेळी संचालक बाळासाहेब मोरे, जयश्री पाटील, अनंत कुलकर्णी, अमर चव्हाण, प्रकाश पताडे, क्रांतीदेवी कुराडे, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक यांच्यासह कारखान्याचे सेक्रेटरी मनोहर मगदूम, विभाग प्रमुख, कामगार, सभासद उपस्थित होते. संचालक सतीश पाटील यांनी आभार मानले. 

एफआरपी पेक्षा अधिक रक्कम अदा
यंदाच्या हंगामासाठी कारखान्याची एफआरपी 2778 रुपये इतकी होती. परंतु, कंपनीने एफआरपीपेक्षा अधिक म्हणजेच 2800 रुपये प्रति टन बिले दिली आहेत. पूर्वीच्या हंगामातही कंपनीने एफआरपीपेक्षा अधिक दर शेतकऱ्यांना अदा केला आहे. 
- ऍड. श्रीपतराव शिंदे, अध्यक्ष गोडसाखर 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com