
विवाहस्थळाच्या ठिकाणी विवाह मतदान स्थळ म्हणून मतदान केंद्र असा उल्लेख आहे.
सिद्धनेर्ली (कोल्हापूर) : विवाह पत्रिका नमुन्याप्रमाणे व्हायरल होत असलेली निवडणूक पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. ‘यंदा कर्तव्य आहे’ या मथळ्याखाली पत्रिका आहे. विवाह पत्रिकेवर कुलदैवत प्रसन्न असा उल्लेख असलेल्या जागी निवडणूक आयोग प्रसन्न असा उल्लेख केला आहे.
वधूच्या नावाच्या ठिकाणी आपली सर्वांची लाडकी चि. सौ. का लोकशाही व वराच्या नावाच्या ठिकाणी भारतमातेचे सुपुत्र चिरंजीव मतदार, असा उल्लेख केला आहे.
विवाहस्थळाच्या ठिकाणी विवाह मतदान स्थळ म्हणून मतदान केंद्र असा उल्लेख आहे. तर शुभ मुहूर्त म्हणून १५ जानेवारी ही मतदानाची तारीख नोंदवली आहे.
हेही वाचा- तिसऱ्यांदा सापडलेल्या मोबाईलमुळे प्रशासनाने सुरक्षेत केली वाढ -
हेही वाचा-जगाला हेवा वाटावा असा देश निर्माण करूया! -
संपादन- अर्चना बनगे