मंगलकार्यालयातून सहा तोळ्याचा सोन्याचा हार लंपास 

राजेश मोरे
Saturday, 23 January 2021

जानवस खोलीतील सहा तोळ्यांचा सोन्याचा हार चोरट्यांने हातोहात लंपास केला.

कोल्हापूर  - फुलेवाडी रिंगरोड परिसरातील एका मंगल कार्यालयाच्या जानवस खोलीतील सहा तोळ्यांचा सोन्याचा हार चोरट्यांने हातोहात लंपास केला. याची नोंद करवीर पोलिस ठाणत झाली. याबाबतची फिर्याद अमरसिंह वसंतराव कमते (वय 42, रा. मंगळवार पेठ) यांनी यांनी दिली. 

पोलीसांनी दिलेली माहिती, अमरसिंह कमते हे बुधवारी (ता.20) नातेवाईकाच्या समारंभासाठी फुलेवाडी रिंगरोड येथील कार्यालयात गेले होते. त्यांच्या नातेवाईकांनी 2012 मध्ये सहा तोळ्याचा सोन्याचा राणीहार केला होता. तो हार त्यांनी मंगल कार्यालयाच्या जानवस खोलीत छोट्या पिशवीत ठेवला होता. ही पिशवी एका प्लॅस्टिकच्या बॉक्‍समध्ये ठेवली होती. चोरट्याने पिशवीतील हा हार  हातोहात लंपास केला. हा प्रकार सकाळी अवघ्या पाऊण तासात घडला.

हे पण वाचा - कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्‍सप्रेस  एक फेब्रुवारीपासून सुरू

 

हार चोरीला गेल्याचे समजल्यानंतर कमते यांनी याबाबतची तक्रार करवीर पोलिसात केली. त्यानुसार पोलिस ठाण्यात तीन लाखांचा हार चोरीला गेल्याची नोंद झाली. पोलिसांनी कार्यालय व परिसरातील सीसी टीव्हीआधारे चोरट्याचा शोध सुरू केला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात हे करीत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six pound gold necklace theft kolhapur