विरोध केला की काश्या तिच्यासोबत करायचा असले भयानक कृत्य

सचिन शिंदे 
Tuesday, 10 March 2020

एक दोन नव्हे तर तब्बल सहा महिलांना यमसदनी पाठवणाऱ्या काशिनाथ काळे उर्फ काश्या महिलांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. गळ्यातील सोन्याच्या गंटणसाठी काळेने चार वर्षात सहा महिलांचा खून केला आहे.

कऱ्हाड तालुक्याच्या माळवाडी नाव्याच्या छोटेखानी गावात मागील आठवड्यात महिलेचा निघृण खून झाला. खून करून त्या महिलेचा मृतदेह ओढ्यातून ओढत आणून एका झाडाला तारेने बांधला होता. त्या खूनावेळी तीच्या गल्यातील, कानातील सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. त्यावरून पोलिसंनी त्या खूनाचा छडा लावला. त्यात काश्या नावाचा संशयीत अटक झाला. त्याच्या अटकेची शक्यता होतीच. मात्र त्याने केलेल्या खुनाची कबुली त्याने दिली. त्यावेळी पोलिस दलही हादरले होते. काही शेकड्यांच्या सोन्यासाठी काश्या महिलांचे खून करत सुटला होता. त्याने माळवाडी केलेला खून सहावा होता. टिचभर सोन्यासाठी महिलांच्या खूनाचा कर्दनकाळ बनलेला हजारमाची येथील काशिनाथ गोरख काळेचा निर्दयीपणा पुन्हा एकदा मन हेलावणारा ठरला...

एक दोन नव्हे तर तब्बल सहा महिलांना यमसदनी पाठवणाऱ्या काशिनाथ काळे उर्फ काश्या महिलांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. गळ्यातील सोन्याच्या गंटणसाठी काळेने चार वर्षात सहा महिलांचा खून केला आहे. त्याशिवाय पाच गुन्ह्यात महिलांना गंभीर जखमी करून सोने पळवले आहे. चंदन चोरी सारखे अन्य काही गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. पोलिसांची सतर्क नजर आणि खबऱ्यांच्या अत्यंत स्ट्रॉग नेटवर्कला भेदून काश्या अट्टल शार्गिद गुन्हेगार तयार झाला. चार वर्षापासून त्याच्या गुन्ह्याची मालिकाच सुरू आहे. मात्र पोलिस त्याला आवर घालू शकलेले नाहीत. सहापेक्षाही जास्त गुन्ह्यात तो अटक होता. त्याला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात प्रत्येक पाच वर्षांची शिक्षाही झाली आहे. तो गजाआड होता. त्यावेळी भोगलेली शिक्षा व नंतर मिळालेली शिक्षा भोगून तो महिना झाले जामीनावर आहे. गळ्यातील सोनेरी दागिना दिसला की, सैरभैर होणाऱ्या काश्याचे कारनामे पुन्हा सुरू आहेत. रानात एकटे काम करणाऱ्या महिलांना गाठून त्यांच्या गळ्यातील दागिने लंपास करायचे. त्यासाठी त्या महिलेला जीवंतही मारायला तो कमी करत नाही. कऱ्हाडचा पवार मळा, औंध, जखिणवाडी, वडोली निळेश्वर, मलकापूरसह मध्यंतरीच्या माळवाडी (मसूर) येथे महिलांचे खून करून त्यांच्या गळ्यातील दागिने काश्याने लंपास केल्याचे वास्तव पोलिसांसमोर आहे. त्यापूर्वीच मागील महिन्यात सुर्लीत एका ज्येष्ठ महिलेच्या डोक्यात दगड घालून तिच्या गळ्यातील सोने लंपास झाले होते. त्याही तपासात काश्याच निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रतिकार करणाऱ्या महिलांचे थेट खून करणारा काश्या सोन्यासाठी महिलांचा कर्दनकाळ बनला आहे.

 सहा वेगवेगळ्या चोरीच्या निमित्ताने काश्याने खून केले. महिलांच्या गळ्यातील सोने त्याने लंपास केलेल्या दागिन्यांसह पैसे व अन्य असा सगळा ऐवज मिळून त्याने दहा तोळेही होत नाही. सहा खूनात केवळ दहा ते बारा तोळे दागिने लंपास आहेत. सावज हेरून त्याला लुबाडण्याची मानसिकता असलेला संशयीत काळे अत्यंत शार्गिद आहे. त्यामुळेच चार वर्षापासून सतत पोलिसांनाही आव्हान देणारा ठरतो आहे. चोऱ्यांसह खूनाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनीचीही दमछाक होताना दिसते. त्यामुळे काश्या रॉबरीच्या खटल्यात सापडतो अन् खूनाच्या गुन्ह्यात सुटतो हेही वास्तव आहे. एक दोन नव्हे तर तब्बल पाच खून, चार हाफ मर्डर, चंदन चोरीसह रॉबरीसारखे गुन्हे त्याच्यावर आहेत. वडोली निलेश्वर येथील खून प्रकरणात कऱ्हाड तालुका पोलिसांनी त्याचे बिंग फोडून त्याला गजाआढ केला. मात्र त्यानंतर सलग पाच खटले त्याच्यावर सुरू होते. वास्तिवक प्रत्येक चोरीतील सोने पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र त्याला शिक्षा होईपर्यंत पोलिसांचा तपास जाताना दिसत नाही. माळवाडीच्या गुन्ह्यातील सोने येथील सराफाला काश्याने विकले होते. तेही पोलिस जप्त करतील. मात्र मागील गुन्ह्यात जामीन मिळून महिना व्हायच्या आतच काश्याच्या कारनाम्याने पोलिस दलाची झोप नक्कीच उडवली आहे, हे मात्र नक्कीच.

विरोध झाला की, जीव घ्यायचाच 

अत्यंत निर्दयीपणे मारून प्रत्येक गुन्ह्यात काश्याने सोने लंपास केल्याचे पोलिस तापासात उघडले आहे. दगड, वीट, तार, कोयता, काठ्या सारख्या हत्याराने काश्या हल्ला करतो. महिलांच्या डोक्यात पहिला वार करतो, दुसऱ्या क्षणाला गळ्यातील गंठण लंपास करत आहे. विरोध झाला नाही, तर त्या महिलेवर दुसरा वार करत नाही. विरोध करणाऱ्या महिलेचा जीव जाण्यापर्यंत तो एकसारखे वार करतो. त्यानंतर महिलेचा मोबाईल डीसट्रॉय करतो. कालच्या माळवाडीच्या गुन्ह्यातही हीच पद्धत त्याने वापरल्याचे पोलिस तपासत सांगत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six women murder in satara district