बाप रे ! कोरोना काॅरंन्टाईन कक्षातच घुसला अस्सल नाग.... मग पुढे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

साप आल्याने काॅरंन्टाईन झालेल्या युवकात घबराट पसरली. सापाच्या भितीने झोप लागत नाही.

उतूर (ता.आजरा ) - येथे गावाबाहेर असलेल्या शाळेत संस्था अलगीकरण केंद्रात पहाटे अस्सल नाग घुसला. सर्पमित्राला बोलावून या जिवंत नागाला जंगलात सोडण्यात आले. पहाटे साडेसहा वाजता हा प्रकार घडाला.

कोरोनाच्या  प्रार्श्वभुमीवर या  शाळेत अलगीकरण केंद्र स्थापण केले आहे. बाहेर गावाहून आलेल्या नागरीकाना या ठिकाणी  ठेवले आहे.  पहाटे यातील एक युवक व्यायाम करण्यासाठी  शाळेच्या व्ह-यांड्यात फिरत होता. यावेळी त्याला आपल्या खोलीत साप जाताना दिसला. त्याने आवाज केल्यावर हा साप समोरील झुडपात जावून बसला. सुरवातीला हा साप बिनविषारी असेल असे वाटले. गावातील सर्पमित्र विजय पाकले याना पाचारण करण्यात आले. पाकले यानी त्याठिकाणी जावून पाहीले तर तो अस्सील नाग होता. पाकले यानी त्यास पकडून गावाजवळील डोंगरात सोडून जिवदान दिले.
साप आल्याने काॅरंन्टाईन झालेल्या युवकात घबराट पसरली. सापाच्या भितीने झोप लागत नाही. यामूळे रात्रीच्या वेळी जागरण करावी लागत असलेचे एका युवकाने सांगितले.

वाचा - जगावर आलंय कोरोनापेक्षाही महाभयानक संकट ; काय आहे ही टोळधाड?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snake entered the Corona quarantine room in uttur aajara