सभागृह वापराविना पडून : ‘सामाजिक न्याय’च्या विपश्‍यना हॉलची अशी अवस्था

Social Justice Building at Kawala Naka  plight of Babasaheb Ambedkar Vipassana Hall
Social Justice Building at Kawala Naka plight of Babasaheb Ambedkar Vipassana Hall

कोल्हापूर : कावळा नाका येथील सामाजिक न्याय भवनमधील डॉ. बाबासाहेब आंबडेकर विपश्‍यना हॉल व सभागृहाची दुर्दशा झाली आहे. मागील दोन वर्षापासून या हॉलवरील छत तुटल्याने पावसाचे पाणी या सभागृहात येत आहे. पावसाच्या पाण्यामुळे सभागृहातील खुर्च्या खराब होत आहेत. हॉलच्या दुरुस्तीसाठी निधी मागूनही मिळालेला नाही. त्यामुळे हे सभागृह वापराविना पडून आहे. 


सामाजिक न्याय भवन बांधल्यावर सर्व विभाग स्थलांतरित केले. समाजकल्याण सहाय्यक आयुक्‍त कार्यालय, जात पडताळणीसह विविध विभाग येथे आहेत. या सर्व विभागांसाठी एक सभागृहही आहे. अत्यंत सुबक व देखणे असणाऱ्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्‍यना हॉलही आहे. येथे लोकांनी येवून साधना करावी, अशी त्यामागची भूमिका होती. या सभागृहाचे छत हे प्लॅस्टिकच्या पत्र्यांचा वापर करून बनवले आहे. मात्र कालांतराने हे छत खराब झाले आहे. अनेक पत्रे तुटले असल्याने तेथून पाणी गळती सुरू झाली आहे. सभागृहातील टेबल, खुर्च्या पाण्याखाली गेल्याने खराब होत आहेत. त्यामुळे खुर्च्या प्लॅस्टिकमध्ये बंदिस्त केल्या आहेत. दोन वर्षे झाली या सभागृहाचा वापर पूर्णपणे बंद आहे.

शासन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते. मात्र छोटासा निधी सभागृहाच्या दुरुस्तीला मिळत नाही, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. सभागृहाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा तर करूच पण निधी दिला नाहीतर आंदोलनही करू. 
अशोकराव माने, दलितमित्र.

सामाजिक न्याय विभागाकडे सभागृहाच्या दुरुस्तीसाठी ८२ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. याला जवळपास दोन वर्षे होत आहेत. मात्र निधी मंजूर झालेला नाही. दरम्यान, सभागृहातील फर्निचर व इतर साहित्य खराब होऊ नये म्हणून ते प्लास्टिक कागदात गुंडाळून ठेवले आहे. 
बाळासाहेब कामत, सहायक आयुक्‍त, समाजकल्याण

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com