ब्रेकिंग : महादेवराव महाडिक गटाला बसला जबर धक्का...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने वाढीव सभासदां विरोधात न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सहसंचालकांनी पडताळणी केली.

कोल्हापूर - कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1415 सभासद अपात्र ठरविण्यात आले आहेत. प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे आणि शनिवारी हा निकालदिला. एकूण 1899 मधील 484 सभासदांना पात्र तर 1415 अपात्र ठरवण्यात आले असुन अपात्र ठरवण्यात आलेले 709 सभासद यलूर मधील आहेत. प्रादेशिक साखर सहसंचालकाच्या या निर्णयामुळे माजी आमदार महादेवराव महाडिक गटाला जबर धक्का बसला आहे.

हेही वाचा - बनावट सभासद म्हणणे हा अपमानच - पंडित पाटील ; राजाराम कारखाना प्रकरण

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने वाढीव सभासदां विरोधात न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सहसंचालकांनी पडताळणी केली. कसबा बावडा येथील सभासदांनी कार्यक्षेत्र 1899 सभासदांना अपात्र ठरवण्यात यावे अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. याबाबत सुनावणी घेऊन 15 फेब्रुवारी पर्यंत निर्णय देण्यात यावा असे आदेश न्यायालयाने साखर सहसंचालकांना दिले होते.

राजाराम कारखान्याचा सत्तासंघर्ष गेली दहा वर्षे सतेज पाटील व महादेवराव महाडिक यांच्यात सुरू आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: some members rajaram sugar factory are ineligible kolhapur