आजरा तालुक्यातील गवसेत लवकरच आरोग्य केंद्र

Soon Health Center At Gavase In Ajara Taluka Kolhapur Marathi News
Soon Health Center At Gavase In Ajara Taluka Kolhapur Marathi News

आजरा : आजरा तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील गवसे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याच्या हालचाली आरोग्य विभागाकडून सुरू झाल्या आहेत. येथील प्राथमिक शाळेनजीकच्या आश्रमशाळेत केंद्र सुरू करण्याचे नियोजन असून बाह्यरुग्ण विभाग तात्पुरत्या स्वरुपात सुरु केला जाणार आहे. त्यामुळे वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेल्या या परिसरातील 23 गावांचा सुमारे 30 किलोमिटरचा फेरा वाचणार आहे. त्याचबरोबर वाटंगी केंद्रावरचा ताणही कमी होणार आहे. 

गवसे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अनेक वर्ष पाठपुरावा सुरू होता. याला मंजूरी मिळून सहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. जागा मिळत नसल्याने हे केंद्र सुरु झाले नाही. गवसे ग्रामपंचायतीने यासाठी जागा उपलब्ध केली आहे. या केंद्राचे बांधकाम सुरू होण्यास अवधी आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात हे केंद्र येथील आश्रमशाळेत सुरु करण्याचे नियोजन पंचायत समितीकडून सुरु आहे. येथे बाह्यरुग्ण विभाग सुरू केला जाणार आहे. 

गवसे परिसरातील देवकांडगाव, विनायकवाडी, मसोली, वेळवट्टी, हाळोली, देवर्डे, माद्याळ, दर्डेवाडी, मेढेवाडी, शेळप, दाभिल, दाभिलवाडी, गवसे, आल्याचीवाडी, किटवडे, आंबाडे, लिंगवाडी, घाटकरवाडी, सुळेरान, धनगरमोळा, पारपोली, खेडगे, गावठाण या गावांना आरोग्य सेवेचा लाभ होणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायीसमितीमध्ये याबाबत जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, सभापती उदयराज पवार यांनी केंद्र तातडीने सुरु करण्याबाबत सुचना मांडली होती. 

तालुक्‍यात चार प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेल्या गावांची संख्या 
वाटंगी ः 22, मलिग्रे ः 26, उत्तूर ः 17, भादवण ः 20 एकूण संख्या ः 96 

प्रस्ताव मागविला
प्रसुती, कुटुंबकल्याण, बाह्यरुग्ण यासह विविध आजारांवर उपचाराची सोय तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी आश्रमशाळेत हे केंद्र सुरू करण्याची सुचना देण्यात आली आहे. आश्रमशाळेची दुरुस्ती झाल्यावर केंद्र सुरु केले जाणार आहे. गवसे ग्रामपंचायतीने गायरानमधील तीन एकर जागा केंद्रासाठी सुचविली आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला आहे. 
- उदयराज पवार सभापती, पंचायत समिती आजरा 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com