सावधान - परवानगीशिवाय रेल्वे रुळ ओलांडाल तर होईल ही शिक्षा....

Southwestern Railway appeals to citizens not to come on railway tracks
Southwestern Railway appeals to citizens not to come on railway tracks

बेळगाव :  देशभरात सध्या प्रवासी रेल्वे बंद आहेत. मात्र, पार्सल, मालवाहतूक व कामगरांची ने आण करण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वे सुरु आहेत. रेल्वे बंद असल्याचा विचार करून काही जण रेल्वे रुळावर येत आहेत. यामुळे त्यांच्या जीवला धोका निर्माण झाला आहे. यामुळेच नागरिकांनी रेल्वे रुळावर येऊ नये, असे आवाहन नैर्ऋत्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. 

औरंगाबाद तालुक्‍यातील सटाणा गावाच्या हद्दीत काहीजण विश्रांतीसाठी रेल्वे रुळावर झोपले होते. जालण्यातील ते 20 मजूर रेल्वे रुळामार्गे पायीच मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघाले होते. गुरुवारी (ता.7) पहाटे सव्वापाचच्या सुमारास मालगाडीने त्यांना चिरडले. यामुळे रेल्वेने रुळावर येणाऱ्यांवर विशेष नजर ठेवली आहे. यासाठी नैर्ऋत्य रेल्वेने रुळावर न येण्याचे आवाहन केले आहे. पुढील अधिसूचना होईपर्यंत प्रवासी रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहे. आवश्‍यक वस्तूंची ने आण करण्यासाठी मालवाहतूक सुरु आहे. यामध्ये अन्नधान्य, कोळसा वीज निर्मिती, खते, पेट्रोलियम उत्पादने, एलपीजी, सिमेंट, लोह धातू, औषधे, डायरी आणि दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाज्या आदी वस्तुंची ने आण केली जात आहे. तसेच नैर्ऋत्य रेल्वेने राज्य सरकारच्या मागणीवर श्रमिक स्पेशल रेल्वे सुरु केली आहे. 

रेल्वे रुळ ओलांडने किंवा रेल्वे मार्गावर चालणे अत्यंत धोकादायक आहे. रेल्वे अधिनियम कलम 147 नुसार परवानगीशिवाय कोणीही रुळ ओलांडू शकत नाही. रुळ ओलांडला किंवा रुळावरून चालल्याने निदर्शनास आले तर ती व्यक्ती शिक्षेस पात्र होते. त्या व्यक्तीला सहा महिने कारावास तसेच 1 हजार रुपये दंड भरावा लागु शकतो. रेल्वेमार्गावरुन फिरणे किंवा ओलांडू नये यासाठी रेल्वेच्या माध्यमांतून जनजागृती अभियान सुरु आहे. ट्रॅक ओलांडण्याऐवजी भुयारी मार्ग, स्थानकांजवळील ब्रिज किंवा क्रॉसिंग गेट वापरावे असे आवाहनही केले आहे. 

ट्रॅकवरून फीरताना आढळल्यास ट्रॅकमॅन, पूल दुरुस्ती कर्मचारी, स्टेशन मास्टर्स, इलेक्‍ट्रिक रिपेयर स्टाफ, आरपीएफ यांना अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच रेल्वे ट्रॅकवरून व्यक्ती फिरताना आढळल्यास आरपीएफ सुरक्षा हेल्फलाईन 182 वर माहिती द्यावी असे आवाहनही नैर्ऋत्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com