
कोल्हापूर : थुंकीमुक्त शहर करण्यासाठी सध्या जनजागृती मोहीम राबवल्या जात आहेत. मंगळवार पेठेतील बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (मिरजकर तिकटी) येथील हुतात्मा स्तंभाजवळ महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त 'आपलं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर' या चळवळीला बळ देण्यासाठी प्रबोधनात्मक फेरी काढून जागृती करण्यात आली. याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस येथील हुतात्मा स्तंभाच्या भोवतीने थुंकीमुक्त कोल्हापूर या विषयावरती रंगावली रेखाटने लावण्यात आली.
या प्रसंगी कृती समितीचे संस्थापक किसणराव कल्याणकर म्हणाले, 'महात्मा गांधी यांच्या कार्याचे स्मरण करुन स्वच्छता आणि शिस्त यामुळे देश पुढे जाऊ शकतो हे गांधीजींनी स्वतंत्रपूर्वीच्या काळात सांगितले होते'. अध्यक्ष रामेश्वर पतकी म्हणाले, 'थुंकीमुक्त कोल्हापूर या चळवळीमध्ये कोल्हापूरातील प्रत्येक घरातील व्यक्तीने जबाबदारीने सहभाग नोंदवून या मोहिमेला यशस्वी करण्याची गरज आहे.'
चळवळ घराघरापर्यंत पोहचवू....
'आपलं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर' या आशयाचे फलक करुन हुतात्मा स्तंभाच्या भोवतीने नागरिकांच्या प्रबोधनासाठी फलक लावण्यात आले आहेत. या चळवळीमध्ये संपूर्ण कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे यासाठी कृती समितीच्या वतीने सातत्याने प्रयत्नशील राहून ही चळवळ घराघरापर्यंत नेण्याचा मनोदय यावेळी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्ती केला.
हे पण वाचा - विवेकच्या कुटुंबाच्या पाठीशी मी स्वतः ठामपणे उभा रहाणार : खासदार संभाजीराजे छत्रपती
या कार्यक्रमाचे संयोजन उपाध्यक्ष डॉ. गुरुदत्त म्हाडगूत, राहूल चौधरी, सतिश पोवार, अशोक लोहार, सचिन जाधव, अमित पवार, कार्याध्यक्ष पृथ्वीराज जगताप यांनी केले होते.
या कार्यक्रमात संस्थापक किसनराव कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पतकी, उपाध्यक्ष डॉ. गुरुदत्त म्हाडगूत, कार्याध्यक्ष पृथ्वीराज जगताप, प्रशांत बरगे, सुनिल हंकारे, सतिश पवार, सचिन जाधव, अशोक लोहार, एम बी. नकाते, अमित पवार, विजय जाधव, मुसा शेख, तेजस जोशी, विपुल मुळे यांच्याबरोबर परिसरातील व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.