एसटीत सॅनिटायझरचा स्प्रिंकलर स्प्रे : अभियंत्याची भन्नाट कल्पना

 https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/online-wedding-ceremony-facebook-live-nesari-kolhapur-281264
https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/online-wedding-ceremony-facebook-live-nesari-kolhapur-281264

कोल्हापूर - निसर्गसंपन्न राधानगरीने जिल्ह्यातील आपली ओळख नेहमीच वेगळी ठेवली आहे. असे असताना या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तरी राधानगरी मागे राहिलीतर नवलच. राधानगरी एसटी आगारातील एका हरहुन्नरी अभियंताने एसटीच्या प्रवेशा ठिकाणीच सॅनिटायझर स्प्रिंकलर स्प्रे बसवला आहे. या मुळे एसटीमध्ये येणार प्रत्येक प्रवासी निर्जंतुक होऊनच एसटीमध्ये प्रवेश करणार आहे. 

कोरोना विरुद्ध लढ्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतानां अनेकांनी आपल्या विचारशक्तीचा वापर करून आप आपल्या पद्धतीने विविध उपाय शोधले आहेत. यातील अनेकांनी तर समाजाचा विचार करून अशे विचार एक वेगळ्या उंचीवर नेऊन प्रत्येक्षात आणले आहेत. असाच एक प्रयोग राधानगरी एसटी आगाराच्या सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक राहुल दत्तात्रय फगरे या अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या तरुणाने केला आहे. त्यांनी एसटी च्या मुख्य द्वारावरच स्प्रिंकलर बसवला आहे. या मुळे प्रवेश करणाऱ्या प्रत्येकावर यातून सॅनिटायझर चा फवारा उडणार आहे.

प्रवेश करणाऱ्याचे शरीर निर्जंतुकीकरण होण्यास मदत मिळणार आहे. सध्या एसटी ची वाहतूक बंद असली तरीही लॉकडाऊन संपल्यानंतर एसटी वर सर्वाधिक ताण येणार आहे. अश्या वेळी एसटी ने देखील तयार असणे गरजेचे आहे. अश्या परिस्थितीत राहुल यांचा हा प्रयोग एसटी खात्यासह प्रवाशाना देखील वरदानच ठरणार आहे. त्यांना या कमी विभाग नियंत्रक रोहन पलंगे,यंत्र अभियंता सुनील जाधव, आगर व्यवस्थापक सागर पाटील यांचे प्रोत्साहन तर विठ्ठल रेपे,नितीन सुतार या यांत्रिक कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.

असे आहे स्प्रिंकलर चे काम

 या स्प्रिंकलर निर्मिती साठी 20 लिटरचा स्टोरेज टॅंक, पाईप, विंडशिल्ड मोटर, आणि कृषी वापराच्या स्प्रिंकलरचा वापर केला आहे. एसटीच्या वीज प्रवाहाशी मोटार जोडलेली आहे. हि मोटार स्टोरेज टॅंक शी जोडलेली असून बटन चालू करताच मोटरद्वारे पंप होणारे सॅनिटायझर हे पाईप मधून स्प्रिंकलरकडे वहन केले जाते. एसटीच्या प्रवेश द्वारावर हा स्प्रिंकलर बसवण्यात आला असून यातून उडणारा फवारा प्रवाशाच्या अंगावर उडतो. या स्प्रिंकलर मधून उडणारा फवारा हा दिढ फूट हुन अधिक व्यासवार पसरत असल्यामुळे संपूर्ण शरीरावर याचा व्यवस्थित शिडकाव होतो.

या गंभीर प्रसंगी चालक आणि वाहकाच्या सुरक्षिततेबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. यातूनच विचार करत या उपकरणाची निर्मिती केली. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. तसेच वरिष्ठ पातळीवर देखील या प्रयोगाची दाखल घेतली गेली असून वरिष्ठानी या प्रयोगाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. माझ्या शिक्षणाचा समाज कार्यसाठी उपयोग झाला यातच माझे समाधान आहे.

- राहुल फगरे

 ( सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, राधानगरी )
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com