स्टार्टअप कट्टा' आजपासून ः दर शनिवारी होणार कार्यक्रम

 Startup Katta 'from today: Events will be held every Saturday
Startup Katta 'from today: Events will be held every Saturday

कोल्हापूर,  : स्टार्टअप आणि उद्योजकता वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांना स्टार्टअपसंबंधी माहिती आणि प्रेरणा देण्यासाठी दैनिक "सकाळ' आणि ओपेक्‍स स्टार्टअप एक्‍सेलरेटर यांच्यातर्फे "स्टार्टअप कट्टा' हा कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा. प्रत्येक शनिवारी हा कार्यक्रम यू ट्यूबवर दाखविण्यात येईल. 

आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया हा केंद्र सरकारच्या उपक्रमासाठी "स्टार्टअप' केंद्रस्थानी आहे. देशात 50 हजारांपेक्षा जास्त स्टार्टअप्स्‌ आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात आज देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स्‌ आहेत. स्टार्टअप सुरू करणारे तरुण आहेत. यात दोन वर्षांत कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज विद्यार्थी नोकरीचे प्रयत्न करण्याऐवजी स्वतःचे स्टार्टअप्स्‌ सुरू करताना दिसत आहेत. दरवर्षी टेक-स्टार्टअपची संख्या दुप्पट होत आहे. ग्रामीण भागातून जास्त स्टार्टअप सुरू होताना दिसत नाहीत. तुलनात्मकदृष्ट्या आज स्टार्टअपसाठी प्रचंड मोठी संधी आपल्याकडे आहे. सध्या तरुणांत तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासाठी लागणारे कौशल्य, त्यांच्यासमोर असणारे असे स्टार्टअपमधील आदर्श यामुळे इथून पुढे बरेच स्टार्टअप्स येणाऱ्या काही दिवसांत दिसतील. आपल्याकडे शेती तंत्रज्ञान, फूड तंत्रज्ञान क्षेत्रात असणारी गरज, कोविड नंतर हेल्थकेअर क्षेत्रातील संधी, ई-कॉमर्स आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये असणारी संधी आजच्या युवकांनी स्टार्टअपच्या माध्यमातून साधली पाहिजे. 
पश्‍चिम महाराष्ट्रातील एकमेव स्टार्टअप एक्‍सेलरेटर असलेल्या कंपनीने त्यांच्या "मुक्काम पोस्ट स्टार्टअप' आणि "आत्मनिर्भर बिझनेस' या कार्यक्रमांना खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर "स्टार्टअप कट्टा' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दैनिक "सकाळ' माध्यम प्रायोजक आहे. यामध्ये स्टार्टअप विश्वातील मान्यवर स्टार्टअपबद्दलचा मनोरंजक आणि प्रेरणादायी प्रवास सांगतील. 

असा होणार "स्टार्टअप कट्टा' 
15 ऑगस्ट : हणमंतराव गायकवाड, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष 
22 ऑगस्ट : इंद्रनिल चितळे, चितळे ग्रुपचे संचालक 
29 ऑगस्ट : डॉ. अपूर्वा जोशी, क्वीक-हील टेक्‍नॉलॉजीच्या संचालिका 
5 सप्टेंबर : सुमित प्रभुणे, हॅकट्रॉन इन्फोसेकचे संचालक 
12 सप्टेंबर ः दादू सलगरे, सलगरे अमृततुल्य चहाचे संचालक 

विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षीस 
"स्टार्टअप कट्टा' हा कार्यक्रम आजपासून दर शनिवारी संध्याकाळी सात वाजता YouTube च्या #opexindia या चॅनेलवर असेल. खास विद्यार्थ्यांसाठी सर्व भागांसाठी सर्टिफिकेट, तसेच कार्यक्रमादरम्यान काही प्रश्न विचारले जातील आणि सर्व भागांतील अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यास आकर्षक बक्षीस देण्यात येईल.

-यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com