'सरकारने पात्र हजारो मराठा उमेदवारांची नियुक्ती करावी'

statement demanding immediate appointment of thousands of candidates from 18 divisions  MP Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati and Guardian Minister Satej Patil demand for  Sakal Maratha Samaj
statement demanding immediate appointment of thousands of candidates from 18 divisions MP Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati and Guardian Minister Satej Patil demand for Sakal Maratha Samaj
Updated on

कोल्हापूर : एसईबीसीमधून निवड झालेल्या महावितरणसह अठरा विभागातील हजारो उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्यावी, या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजातर्फे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व पालकमंत्री सतेज पाटील यांना आज देण्यात आले. 


निवेदनात म्हटले आहे की, महावितरणमध्ये सरळ सेवा कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांची कागद पडताळणी ४ फेब्रुवारीला झाली. त्यानंतर ४५ दिवसांत नियुक्ती मिळणे आवश्यक होते. नऊ महिने झाले तरी त्यांची नियुक्ती झालेली नाही. आरोग्य, महावितरण तंत्र, महा मुंबई मेट्रो नाॅन, विक्रीकर निरीक्षक, राज्य सेवा, कर सहायक, लिपिक, सहायक विभाग अधिकारी, तलाठी, एमएससी बोर्ड लिपिक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, एमईएस स्थापत्य अभियांत्रिकी, महावितरण उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहायक भरती प्रक्रियेतील हजारो उमेदवारांच्या नियुक्‍त्या रेंगाळल्या आहेत. 


एमपीएससी परीक्षेत एसईबीसी खुल्या गटातील वयोमर्यादा घटल्याने अनेक मराठा युवकांच्या संधी हुकली जाणार आहे. त्यामुळे ११ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेला स्थगिती द्यावी. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण स्थिती व त्यानंतरच नवीन भरती प्रक्रिया राबवावी. आरक्षणा अभावी मराठा समाजाच्या दोन-तीन पिढ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून, आरक्षण मिळाल्याने आर्थिक दुर्बल मराठ्यांना नोकरी व शैक्षणिक संधी मिळत असताना आरक्षण स्थितीमुळे संधींवर गंडांतर आले आहे. त्यामुळे शासनाने पात्र हजारो मराठा उमेदवारांची नियुक्ती लवकर करावी.शिष्टमंडळात वसंतराव मुळीक, गुलाबराव घोरपडे, हर्षल सुर्वे, शाहीर दिलीप सावंत, मयूर पाटील, प्रताप नाईक, युवराज जाधव, अमित आडसुळे, सुनील शिंत्रे यांचा समावेश होता.


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com