'त्या' पाण्याने घेतला तिचा जीव....

The student poisoned by water student was no more
The student poisoned by water student was no more

शिरोळ - शिरटी ता.शिरोळ येथील शिरटी हायस्कूल शिरटी मध्ये, इयत्ता 10 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीला पाण्यातून विषबाधा झाली होती. गेली पाच दिवस तिच्यावरती उपचार सुरु होते. आज मंगळवारी पहाटे उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाला. सानिका नामदेव माळी वय 16 वर्षे असे मयत झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. दरम्यान सानिकाच्या नातेवाईकांनी तिच्या मृत्यूला जबाबदार असणार्यांवर कारवाई करावी या मागणीकरीता पाच तास मृतदेह शाळेच्या दारात ठेवल्याने, शिरटीमध्ये तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

 गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी सानिका माळी ही शाळेच्या, प्रयोगशाळेच्या खोलीमध्ये सानिका 10 वी ची प्रॅक्‍टीकल परीक्षा देण्याकरीता आली होती. परीक्षा झाल्यानंतर तिने पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी पिल्या नंतर काही क्षणातच तिला अस्वस्थ वाटू लागले. तसेच काही क्षणात ती बेशुध्द पडली. आईवडीलांनी तिला उपचाराकरीता शिरोळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. शिरोळमध्ये उपचार सुरु असताना तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने, पुढील उपचाराकरीता कोल्हापुरच्या खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले. 

पालकांकडून घातपाताचा संशय 

गेली पाच दिवस सानिका मृत्युशी झुंज देत होती. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास तिचा मृत्यु झाला. सानिकाच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह मंगळवारी सकाळी शिरटी येथील शाळेच्या आवारात आणला. सानिकाच्या बॉटलमधील पाण्यामधुन विषबाधा झालीच कशी ? तिचा घातपात करण्याच्या हेतुने पाण्यामध्ये अज्ञातांनी विष मिसळले असल्याची शक्‍यता नातेवाईकांनी वर्तवली आहे. सानिकाच्या मृत्युला जबाबदार असणार्यांवरती कारवाई करावी या मागणीकरीता सानिकाच्या आई वडीलांनी व नातेवाईकांनी आक्रोश करत तब्बल पाच तास मृतदेह शाळेच्या आवारात ठेवला. 

पोलिसांची मध्यस्ती

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस घटनास्थळी आले. पोलीस ठाण्यात रितसर तक्रार द्या या घटनेची सखोल चौकशी करुन दोषीवरती कारवाई केली जाईल, असे शिरोळ पोलीसांनी सांगितले. या घटनेचा निषेध व्यक्‍त करण्याकरिता शिरटीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर दुपारी सानिकावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com