वा रे बहाद्दर ! सलग 33 तास प्रवास करत मुलं सुखरूप पोहचवली कोल्हापुरात...

The student trapped at Kota were brought to Kolhapur by ST
The student trapped at Kota were brought to Kolhapur by ST
Updated on

कोल्हापूर - कोटा (राजस्थान) येथे कोरोना संकटात अडकलेल्या मुलांना कोल्हापूरात पाठवण्याचा निरोप एसटी मुख्यालयातून आला. परजिल्ह्यातील मुले परराज्यात संकटात आहेत. त्यांना घरी पोहचवणेही जबाबदारी आहेच असे म्हणत आम्ही एसटी कोट्यातून बस काढल्या. सलग 33 तास प्रवास केला. तीन राज्ये, 17 जिल्हे ओलांडत शेवटचा जिल्हा असलेल्या कोल्हापुरात मुलांना सुखरूप पोहचवले. त्या मुलांची घालमेल,त्यांचे कोमजलेले चेहरे कोल्हापुरात पोहचताच समाधानाने भरून गेले. त्या 40 मुलांच्या पालकांच्या डोळ्यात आनंदश्रु दाटले. एसटीच्या 25 वर्षाच्या सेवेतील हेच मोठे प्रशस्तीपत्रक आम्हाला लाभले. याचा आनंद घेऊन आम्ही धुळ्याला मार्गस्त होत आहे. एसटीच्या चार चालकांनी दै. सकाळशी बोलताना या भावना व्यक्त केल्या.

घालमेल अनुभवणारी मुले गाडीत बसली

राजस्थानातील कोटा येथे महाराष्ट्रातील जवळपास अडीचशे विद्यार्थी कोरोना लॉकडाऊनमुळे अडकून पडले. त्यांना आणण्याची जबाबदारी राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या धुळे विभागावर होती. त्यानुसार धुळे विभाग नियंत्रक एस. बी. संकपाळ एसटी अधिकाऱ्यांनी मार्ग, वेळ, इंधन पुरक बाबींचे नियोजन केले. धुळ्याच्या गाड्या कोट्यात गेल्या. एसटीची लालपरी बघून जणू आपले पालक आपल्याला न्यायला आले, म्हणून घालमेल अनुभवणारी मुले गाडीत बसली. एवढ्या लांबचा प्रवास कसा होणार याची चिंता त्यांना होतीच या आदेशानुसार गाडी कुठेही थांबवायची नव्हती. त्या गाड्या काढल्या 15 तासातच धुळ्यात आणल्या तिथे मुलाना चहा, नाष्ठा, जेवण देण्यात आले. तसा प्रवास सुरू झाला, राजस्थानातून गुजरातमध्ये मार्गे प्रवास सुरू झाला. बहुतेक एसटी बसल्यानंतर बहुतेक विद्यार्थीच्या दंगा हमखास असतो. यावेळी मात्र बहुतेक सर्व मुले खिन्न मनाने बसून होती. कधी एकदा गाव येतो. याची हुरहुरू प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ठळक होती. अशात दोन एसटी गाड्या धुळ्यात पोहोचल्या. इंधन भरले,पून्हा प्रवास सुरू झाला. प्रत्येक जिल्ह्याच्या नाक्‍यावर पोलिस अडवत होते. वैद्यकीय यंत्रणा प्रकृतीची चौकशी करीत होत्या.

शासन आदेश पाहून पुढे सोडत होते. असे होत सलग दोन दिवस प्रवास शनिवारी सकाळी सात वाजता गाड्या कोल्हापूरात सीपीआर रूग्णालयात पोहचल्या कोणाचे पालक येथे आले होते. मुले पटापट गाडीतून उतरली. आई वडीलांच्या गळ्यात पडण्याची भावना सोशल डिस्टन्समुळे गळून पडली. पण डोळ्यांनी एकमेकां भरभरून पहाता आले. "आपल लेकरू आपल्या जवळ आल' असा भाव घेऊन पालक व मुलांचे डोळे पाण्याने डबडबले तसे सिपीआर मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी रांग लागली.

मुलांची व पालकांची भेट झाली. आम्ही 33 तास गाडी चालवत आल्याचा क्षीण क्षणात गळून पडला. त्याभेटीच्या आनंदाची उर्जा व आमची रोजीरोटी असलेली एसटी घेऊन आम्ही पून्हा धुळ्याच्या दिशेने मार्गस्त झालो. 25 वर्षे एसटीची प्रवासी सेवा दिली. मात्र कोरोना संकटामुळे आई वडीलांपासून दुरावलेली, संकटाच्या भितीने आवक झालेली, परमुलाखात एकाकी झालेल्या मुलांना त्यांच्या गावी पोहचले. आणि एसटीच्या सेवेत धन्य झाल्याची अनुभूती घेत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com