सुभद्रा बॅंकेची 16 कोटींची सुरक्षित गुंतवणूक, एकमेव लोकल एरिया बॅंक इतिहासजमा

Subhadra Bank's secure investment of Rs 16 crore, the only local area bank in history
Subhadra Bank's secure investment of Rs 16 crore, the only local area bank in history
Updated on

कोल्हापूर ः रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी केलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याचे येथील सुभद्रा लोकल एरिया बॅंकेला भोवले असून त्यातूनच बॅंकेचा परवाना रद्द झाला आहे. तथापि बॅंकेची 16 कोटी आठ लाख रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकारकडे सुरक्षित असून बॅंकेकडे असलेल्या सात कोटी 94 लाखांच्या ठेवी सुरक्षित आहेत. मात्र, या कारवाईने बॅंकेत काम करणाऱ्या 127 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर मात्र गंडातर आले आहे. 
ठेवीदारांच्या हिताविरोधात काम करत असल्याचा ठपका ठेवून रिझर्व्ह बॅंकेने गुरूवारी (ता. 24) सुभद्रा लोकल एरिया बॅंकेचा बॅंकिंग परवाना रद्द केला. देशात चार लोकल एरिया बॅंका होत्या. त्यात कॅपिटल, तामिळनाडू व पंजाबमधील तीन बॅंकांचे परवाने यापुर्वीच रद्द केले आहेत. गेल्या पाच वर्षापुर्वी सुभद्रा ही देशात एकमेव लोकल एरिया बॅंक सुरू होती. महाराष्ट्रात 11 आणि कर्नाटकात एक अशा बारा शाखा असलेल्या या बॅंकेचेही अस्तित्त्व या निर्णयाने संपुष्टात आले आहे. 
पाच वर्षापुर्वी येथील प्रसिद्ध उद्योजक आर. एम. मोहिते यांच्याकडे या बॅंकेचा ताबा होता. त्यांची बॅंकेत सुमारे 25 कोटी रूपयांची गुंतवणूक असल्याचे समजते. 2016 साली ही बॅंक मुंबईच्या हिरे व्यापारी ग्रुप असलेल्या कोठारी ग्रुपकडे देण्यात आली. तेव्हापासून या ग्रुपकडूनच बॅंकेचे व्यवहार सुरू होते. पण बॅंक ताब्यात घेतल्यानंतर त्यांनीही ठेवी स्विकारणे व कर्ज वाटपात फारसे लक्ष न दिल्याने रिझर्व्ह बॅंकेने मार्च 2020 मध्येच कामकाजात सुधारणा करण्याची सुचना केली होती. पण त्यानंतर बॅंकेच्या व्यवहारावर फारसा परिणाम न झाल्याने अखेर या बॅंकेचेच अस्तित्त्व रिझर्व्ह बॅंकेने संपवले. एकीकडे खासगी आणि राष्ट्रीयकृत्त अनेक बॅंकांत मोठे मोठे घोटोळ उघडकीस आल्यानंतर अशा बॅंकांना सरंक्षण देणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेने सुरक्षित ठेवी आणि मोठी गुंतवणूक असूनही सुभद्रा बॅंकेवर केलेल्या कारवाईने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
............... 
दृष्टीक्षेपात बॅंक 
कार्यक्षेत्र - महाराष्ट्र, कर्नाटक 
मुख्यालय - कोल्हापूर 
शाखा - 12 (महाराष्ट्र 11, कर्नाटक -1 (निपाणी) 
ठेवी - 7 कोटी 94 लाख 
कर्ज वाटप- 7 कोटी 30 लाख 
एनपीए- 2 टक्के 
सीआरएआर- 48 टक्के 
सीडी रेषो- चांगला 
केंद्राकडे गुंतवणूक - 16 कोटी 8 लाख 
................... 
आरबीआयकडूनच प्रशंसा 
रिझर्व्ह बॅंकेने सुभद्रा बॅंकेवर कारवाई केली असली तरी त्यासंदर्भात काढलेल्या आदेशातच बॅंकेची अर्थिक स्थिती (लिक्वीडीटी) चांगली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बॅंकेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम मिळेल पण त्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. 
.......... 
कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय 
बॅंकेकडे सुमारे 127 कर्मचारी आहेत. यापैकी सुमारे 60 टक्के कर्मचाऱ्यांना जेमतेम 10 ते 15 हजार पगार आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयाने या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गंडातर आले आहे. आता वय झाल्याने इतरत्र नोकरी मिळणेही मुश्‍किल आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबाचेही भविष्य अंधकारमय झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com