
कोल्हापूर ः महापालिकेचा बांधकाम परवाना मिळावयाचा म्हटले की "शेंगरू मेले हेलपाट्याने' अशी अवस्था अनेकांची व्हायची. फेऱ्या मारून थकलेल्यांना राहू तो बांधकाम परवानगी आणि घरही अशी मानसिकता व्हायची. बांधकाम व्यावसायिंकांना अडचणीना सामोरे जावे लागत होते. युनिफॉईड बायलॉजने दप्तर दिरगांई टळणार असली तरी बांधकाम परवाना वेळेत देऊन प्रिमियमच्या रूपाने उत्पन्न वाढविण्याची फार मोठी संधी महापालिकेला उपलब्ध झाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बांघकाम व्यावसायिक युनिफाईड बायलॉजसाठी प्रयत्नशील होते. बांधकाम परवान्याची कटकट दूर होऊन लवचिकता यावी, यासाठी बायलॉज मंजूर झाले आहेत. 22 मजल्यापर्यंत इमारतीची उंची वाढविता येणार आहे. शहराचा आडवा विकास होण्याऐवजी उभा विकास होणार आहे. महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत बांधकाम परवाना दिला जातो. पुर्वी बांधकाम परवाना विशिष्ट चौरस फूटापर्यंत विभागीय कार्यालये मार्फत दिली जात होती. आर्किटेक्टरच्या माध्यमातून फाईल इनवर्ड करण्यापासून परवान्याचा प्रवास सुरू व्हायचा. सर्व्हेअरचा अभिप्राय, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता नंतर शहर अभियंता असा प्रवास व्हायचा. साठ दिवसांच्या आत परवाना मिळावा, असे अपेक्षित असतान तीन चार महिने उलटले तरी तो मिळत नव्हता. बांधकाम व्यावसायिक आणि सामान्य नागरीक अक्षरक्षः घाईला यायचे.
बांधकाम व्यावसायिकांना रेरा कायदा, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, जीएसटी याचा सामना करावा लागत होता. जागेचे दर अव्वाच्या सव्वा त्यात शासकीय तसेच मनपा यंत्रणेचा मनस्ताप, यामुळे परवाना देण्याच्या पारंपारिक नियमात बदल होणे आवश्यक होते. बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या क्रिडाई संघटनेने पाठपुरावा केला. व्यावसायिक परवानगीसाठी प्रिमियमच्या रूपाने महसूल जमा करण्यासाठी तयार आहे. मात्र पालिकेची यंत्रणा किती गांभीर्याने हा विषय घेणार आहे. त्यावर अंमलबजावणी आणि बायलॉजचे यश अवलंबून राहणार आहे. पालिकेच्या उत्पन्नाबाबत सातत्याने चर्चा होते. नगरचना विभाग हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. प्रिमियमच्या रूपाने तिजोरीत मोठ्या प्रमाणाची महसूल जमा करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे.
युनिफाईड बायलॉज ही बांधकाम परवाना आणि त्या अनुषंगाने असलेल्या बाबींची पुर्तता करण्याची सहज आणि सुलभ अशी नियमावली आहे. यात प्रत्येकाची जबाबदारी आणि बांधकाम परवान्यासाठी वेळेची जबाबदारी निश्चित केली आहे. महापालिकेने प्रभावी अंमलबजावणी केल्यास महसूल वाढण्यास मदत होईल.
विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष क्रेडाई, कोल्हापूर
--
संपादन ः यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.