कोल्हापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांकडून एफआरपी जमा

suger cane FRP diposit from six factories in Kolhapur district
suger cane FRP diposit from six factories in Kolhapur district

कोल्हापूर : गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर चौदा ते पंधरा दिवसातच एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली आहे. यामध्ये, गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलवडे (गोडसाखर), संताजी घोरपडे (कागल), राजगोळी खुर्द (ता. चंदगड) हेमरस, शाहू साखर कारखाना (कागल), बिद्री व जवाहर कारखान्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना ऊस तोड झाल्यानंतर चौदा दिवसात एफआरपी द्यावी, असा कायदा आहे. त्यानूसार या साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षीच्या गळीत हंगाम जोमाने सुरु आहे. दरम्यान, उसाचे आणि साखरेचे बंपर उत्पादन होणार असे अंदाज आहे. उसाची वेळेत बिले मिळावीत यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह असतो. यापार्श्‍वभूमीवर यावर्षी जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी आतापर्यंत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केली आहे. 
गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना (आप्पासाहेब नलवडे) संचालित ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीकडून (गोडसाखर) पहिल्या पंधरा दिवसातील एकरकमी एफआरपी 2 हजार 800 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली आहे. गोड साखरेने 23 दिवसांत 65 हजार 460 टन उसाचे सरकारी 10.77 टक्के उताऱ्याने गाळप केले आतापर्यंत 68 हजार 730 क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे. याची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली आहे. 

काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यानेही पहिल्या पंधरा दिवसात झालेल्या ऊस तोडीची2 हजार 892 रुपये प्रमाणे एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. याच पंधरावड्यातील तोडणी वाहतुकीची वाढीव दरासह बिले काढली आहेत. वेळेत बिले मिळाल्यामुळे तोडणी-ओढणी वाहतूकदारही समाधान व्यक्त करत आहेत. 
दरम्यान, राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याने वाहतूक दरात आठ टक्के वाढ केली आहे. उसाची बिल प्रतिटन 2985 एफआरपी प्रमाणे एकरकमी रक्कमी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली आहे. 11 दिवसात 53 हजार 140 टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.22 आहे. इतर साखर कारखान्यांनीही वेळेत एफआरपीची रक्कम देण्याचे नियोजन केले आहे. 
कागल येथील शाहू साखर कारखाना 2 हजार 973 पहिला हप्ता दिला आहे. या सर्व कारखान्यांनी ऊस तोडीपासून वेळेत एफआरपी दिली आहे. बिद्री साखर कारखान्याने प्रतिटन 3073, जवाहर कारखान्यांने 2800 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. उद्या-परवा ही काही कारखान्यांची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होवू शकते.

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com