पती-पत्नीने आयुष्याचा प्रवासही संपविला एकत्रच; भाजी विक्रेत्याच्या मृत्यू हळहळ 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करता येत नसल्याचे असे सांगितले होते. त्यामुळे ते घरीच होते

पेठवडगाव (कोल्हापूर) - आजारपणास कंटाटळून वृद्ध दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. शिवाजी ज्ञानू ठोंबरे (वय 85), पत्नी मुक्ताबाई (वय 80, रा. पेठवडगाव) असे त्यांचे नाव आहे. 

शिवाजी ठोंबरे भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते होते. वृद्धत्वामुळे काही वर्षांपासून ते घरीच होते. आठ दिवसांपूर्वी बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्‍चर झाला होता. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करता येत नसल्याचे असे सांगितले होते. त्यामुळे ते घरीच होते. हालचाल करता येत नसल्याने ते निराश होते. त्यांची पत्नीसुद्धा अजारी होती. तीन मुलांसह ते घरातच एका बाजूला पत्नीसह राहत होते. नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजता जेवण करून दांपत्य झोपी गेले.

हे पण वाचागडावरची स्टंटबाजी आली अंगलट! बेदम मारत जमिनीवर घासायला लावले नाक; मग गावकऱ्यांनी शोधला जालीम उपाय

 

सकाळी आठ वाजता त्यांना उठवण्यासाठी सून गेली असता दोघांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शवविच्छेदन नवेपारगांव येथील आरोग्य केंद्रात झाले. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रामेश्‍वर वैजणे यांनी भेट दिली. पेठवडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून तपास पोलिस निरीक्षक संतोष घोळवे,सहाय्यक पोलिस निरीक्षक खान करीत आहेत. 
                 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide suicide kolhapur vadgaon kolhapur news