रविवार ठरला पर्यटनवार, कोल्हापुरात भाविकांची गर्दी

संभाजी गंडमाळे
Monday, 25 January 2021

कोल्हापूर ः प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या रविवारी शहर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले. अंबाबाई मंदिरात आज सकाळी दर्शनासाठी असलेली भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत गेली. महाद्वार रोज, बिंदू चौक, मध्यवर्ती बस स्थानक परिसर या ठिकाणी पर्यटक, भाविकांची वर्दळ होती. कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर खंडीत झालेले कोल्हापूरचे पर्यटन रुळावर आल्याचे यातून दिसले. 

कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मुळे तब्बल सहा महिने जिल्ह्यातील पर्यटन पूर्णपणे बंद होते. यामुळे स्थानिक बाजारपेठेला मोठा फटका बसला होता. त्यानंतर ऍनलॉक झाल्यावर दळणवळण पूर्वत सुरू झाले. दसरा झाला आणि पुन्हा शहरात पर्यटकांची वर्दळ दिसू लागली. वर्षाअखेर नंतर स्थानिक पर्यटन पुन्हा पूर्वपदावर येऊ लागल्याचे दिसले. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीच्या निमित्ताने आज पुन्हा पर्यटकांनी शहर गजबजले. मंगळवारी प्रजासत्ताक दिन असल्याने शनिवार, रविवार आणि सोमवार अशी सुट्टी काढून पर्यटकांनी सहलीची योजना आखली आहे. कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनी रविवारी शहरात थांबून अंबाबाईचे दर्शन घेतले. यामुळे सकाळपासूनत शहरात पर्यटकांची वर्दळ होती. 10 वाजेपर्यंत अंबाबाई मंदिरातील दर्शनरांग भवानी मंडपाच्या कमानीपर्यंत गेली होती. विद्यापीठ हायस्कूल, बिंदू चौक, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर येथील पार्किंगही भरलेली होती. शहरातून कोकणात जाणारे राज्य महामार्गांवर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होती. त्यामुळे शहरात येणाऱ्या मार्गांवर वाहतूक संथ गतीने सुरू होती. शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतीबा रोड, रंकाळा परिसर येथे पर्यटकांची गर्दी होती. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पर्यटकांनी कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेतला. या हॉटेलमध्येही पर्यटकांची वर्दळ दिसत होती. 

दृष्टिक्षेपात 
अंबाबाई मंदिरातील दर्शनरांग भवानी मंडपाच्या कमानीपर्यंत 
महाद्वार रोज, बिंदू चौक, मध्यवर्ती बस स्थानक परिसरात वर्दळ 
सलग सुट्टीमुळे पर्यटक कोल्हापूरकडे

संपादन - यशवंत केसरकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday was a tourist day, a crowd of devotees in Kolhapur