देखरेख करणाऱ्यांचा 16 तोळे सोन्यावर डल्ला...

प्रतिनिधी
Thursday, 14 May 2020

कोल्हापूर  ः राजारामपुरीतील फ्लॅटमधून 16 तोळे दागिन्यांच्या चोरीचा छडा लावण्यात राजारामपुरी पोलिसांना यश आले. घराचे बांधकाम सुरू असल्याने प्रापंचिक साहित्यावर देखरेखीसाठी ठेवलेल्याच कर्मचाऱ्याने दागिन्यांवर डल्ला मारला. मित्राच्या मदतीने त्याने हे सोने सराफाला विकल्याचे उघड झाले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केल्याचे पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी सांगितले. 

कोल्हापूर  ः राजारामपुरीतील फ्लॅटमधून 16 तोळे दागिन्यांच्या चोरीचा छडा लावण्यात राजारामपुरी पोलिसांना यश आले. घराचे बांधकाम सुरू असल्याने प्रापंचिक साहित्यावर देखरेखीसाठी ठेवलेल्याच कर्मचाऱ्याने दागिन्यांवर डल्ला मारला. मित्राच्या मदतीने त्याने हे सोने सराफाला विकल्याचे उघड झाले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केल्याचे पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी सांगितले. 
अटक केलेल्या संशयितांची नावे ः मुख्य सूत्रधार कुमार राजवर्धन नलवडे (वय 20, राजारामपुरी दुसरी गल्ली), प्रथमेश नामदेव मस्कर (वय 18, रा. टाकाळा), किरण जयवंत पोतदार (वय 29, रा. सासने कॉलनी) अशी आहेत. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, सत्यजित भीमाशंकर बोधे हे राजारामपुरी सहाव्या गल्लीतील रजनी विहास अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची प्रेस आहे. संशयित कुमार नलवडे हा दुसऱ्या प्रेसमध्ये नोकरी करत होता. तो बोधे यांच्याकडे कामास आला. त्यांनी त्याला फर्ममध्ये मदतनीसाचे काम दिले. बोधे यांच्या फ्लॅटच्या नूतणीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे ते डिसेंबर 2019 पासून रायगड कॉलनी येथे राहण्यास गेले. त्यांनी आपले प्रापंचिक साहित्य फ्लॅटमध्येच ठेवले होते. या कामावर देखरेख करण्याचे काम कुमारवर सोपविण्यात आले होते. बांधकामाचे काम पूर्ण झाल्यानंतर ते सफाईचे काम करून फ्लॅटमध्ये राहण्यास आले. साहित्य लावत असताना त्यांना कपाटातील साडेचार तोळ्याचे सोन्याचे गंठण, तीन तोळ्यांच्या बांगड्या, तीन तोळ्यांचे टॉप्स्‌, नेकलेस, एक तोळ्याचे कानातील टॉप्स्‌, अर्धा तोळ्याची अंगठी, एक तोळ्याची चेन, तीन तोळ्यांची सोन्याची बिस्कीटे असे 16 तोळ्यांचे सुमारे सव्वाचार लाखांचे दागिने आणि पाच हजारांची रोकड चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबतची फिर्याद मंगळवारी (ता.12) रात्री उशिरा राजारामपुरी पोलिसांत दिली. पोलिसांनी अवघ्या तासाभरात पोलिसांनी संशयित कुमार नलवडेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपण फ्लॅटमधील दागिने चोरले. हे दागिने मित्र संशयित प्रथमेश मस्करच्या मदतीने संशयित सराफ किरण पोतदारला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या तिघांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या तिघांना 16 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरेंच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे, कर्मचारी आनंदा निगडे, प्रकाश पारधी, सिद्धेश्‍वर केदार, रोहीत पवार, सुभाष चौगले, महेश पाटील, प्रशांत पात्रे यांनी केली. स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supervisors weigh 16 ounces of gold ...