Video : ...तर महाराष्ट्र देशात एक नंबरचे राज्य होईल 

अमोल सावंत
Friday, 22 January 2021

खासदार  सुळे यांनी आज कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळाला भेट देऊन पाहणी केली

कोल्हापूर  : "कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर व्यापक बैठक घेऊ,'' अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 

खासदार  सुळे यांनी आज कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या. 

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शाहू जन्मस्थळाचे प्रमुख उत्तम कांबळे, उदय सुर्वे यांनी जन्मस्थळाबाबतची माहिती दिली. तत्पूर्वी, खासदारसुळे यांनी राजर्षींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. राधानगरी धरणाची प्रतिकृती, राजर्षीं शाहूंजाचा जिथे जन्म झाला ते दालन, परिसरातील प्राचीन दगडी कलाकृती, विरगळ, घोड्याच्या पागा आदीबाबतची माहिती घेतली. राजर्षीं शाहू महाराजांची मुळ छायाचित्रे पाहिली. 

शाहू जन्मस्थळाबाबत आढावा घ्या. जन्मस्थळासाठी लागणारा जो निधी आहे, त्याबाबत "झुम'द्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर संवाद साधा, असे खासदार सुळे यांनी सांगितले. 

शाहू जन्मस्थळावर अनेक कामे प्रलंबित आहेत. यासाठी शासकीय निधी मिळाल्यानंतर उर्वरीत कामे पूर्ण करता येतील असे सांगत खासदार सुळे म्हणाल्या, "शाहू जन्मस्थळ ही वास्तू मी आज पाहीली. उपमुख्यमंत्री अजित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील या दोघांशी चर्चा करुन या वास्तूचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल, यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते डॉ. जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनासाखीाल  पूर्ण करुया. या ऐतिहासिक डॉक्‍युमेंटेशनचे महत्वाचे काम झाले पाहिजे. आपल्या देशामध्ये डॉक्‍युमेंटेशन करण्यामागे आपण खरेच कमी पडत असतो. त्याच्यामुळे पुढील पिढीला अधिच्या पिढीचे चांगले काम केलेले व्यवस्थित डॉक्‍युमेंटेशन न केल्याने त्यात कमतरता राहते. नाहीतर या जगामध्ये सगळ्यात सुंदर असा इतिहास असणारा हा भारत देश आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेले हे योगदान महत्वाचे आहे. राजर्षी शाहू महाराज हे दृष्टा नेता होते. त्यांनी दिलेली ही दिशा आहे. आज आपण राजर्षींनी दिलेल्या संस्कारांवर चाललो तरी आपले महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये एक नंबरचे राज्य होईल. राजर्षींनी केलेले कलाक्षेत्र, इकॉनॉमिक पॉलिसी अशा अनेक क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. छत्रपती शिवरायांचे  काम पुढे नेण्याचे कार्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले आहे. त्यांच्या या जन्मस्थळाची ओळख महाराष्ट्रालच नव्हे; तर देशासाठी महत्वाची आहे. त्यामुळे ही वास्तू आपण जतन केली पाहिजे. एका भारतीयांनासुद्धा हे वाटले पाहिजे की, आपण कोल्हापुरमध्ये जाऊन ही वास्तू पाहिली पाहिजे.'' 

नगरसेवक अशोक जाधव, अभिजित जाधव, रोहिती उलपे, शुभम जाधव, अजिंक्‍य जाधव, मुख्याध्यापक अंजली जाधव यांनी सौ. सुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. मंजुश्री पवार, प्रज्ञाताई पवार, नावीद मुश्रीफ, मेहबुब शेख, आदील फरास, रविकांत वर्पे, वसंत मुळीक, राकेश कामटे, महेंद्र चव्हाण, प्रसाद उगवे, भारत देशमुख, रामराजे बराले, प्रशांत पाटील, प्रताप घोरपडे आदी उपस्थित होते. 

व्हिडिओ - 

>

हे पण वाचा भाजपमध्ये अनेकजण वैतागलेले; सुप्रिया सुळेंच मोठ वक्तव्य  

सायलन्स प्लीज...! 

हा समृद्ध परिसर आहे. यामुळे परिसरात शांतात प्रत्येकाने बाळगावी, हळू आवाजात बोलावे, अशा सूचनाही खासदार सौ. सुळे यांनी यावेळी दिल्या. तसेच परिसरात ध्वनी निर्बंधित क्षेत्र असा बोर्ड अन्‌ मोबाईल जामरही लावावा, असे सांगितले.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya sule kolhapur shahu born place