कोल्हापूरनंतर 'या' तालुक्याच्या ठिकाणी प्रथमच स्वॅब तपासण्याची व्यवस्था...

swab testing  of the Corona suspects Gadhinglaj is now
swab testing of the Corona suspects Gadhinglaj is now

गडहिंग्लज - कोरोना संशयितांच्या स्वॅबची (घशातील स्त्राव) आता गडहिंग्लजला तपासणी होणार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात 'ट्रयू-नॅट' मशीन बसविण्यात आले आहे. तासाला दोन स्वॅब तपासणी करण्याची या मशिनची क्षमता आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले असून येत्या चार ते पाच दिवसात प्रत्यक्ष स्वॅब तपासणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरनंतर तालुक्याच्या ठिकाणी प्रथमच स्वॅब तपासण्याची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे अहवाल लवकर मिळण्यास मदत होणार आहे.

कोरोना संशयित व्यक्ती बाधित आहे की नाही हे त्याच्या स्वॅबची तपासणी केल्यानंतरच स्पष्ट होते. सुरुवातीच्या टप्प्यात स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवावे लागत होते. एप्रिल महिन्यामध्ये कोल्हापूर येथे तपासणीची व्यवस्था केली. पण पुण्या-मुंबईसह परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने कोल्हापूरच्या प्रयोग शाळेवरही ताण आला. यातून अहवालांना विलंब होऊ लागला. अनेकांचे अहवाल तर क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर आले. तोपर्यंत बाधित व्यक्तींना विलगीकरण कक्षातून सोडल्याच्याही घटना उघडकीस आल्या. यातून संपर्कातील आलेल्यानाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होत आहे. अहवाल लवकर मिळावे, यासाठी उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी करण्याची मागणी पुढे आली होती.

दरम्यान, येथील उपजिल्हा रुग्णालयात शासनाकडून आज ट्रयू-नॅट हे अत्याधुनिक मशीन आले आहे. या मशीनमध्ये तासाला दोन स्लॅबची तपासणी होऊ शकते. या मशीनला मोबाईल जोडलेला असून सिम कार्डचीही व्यवस्था आहे. त्यामुळे थेट मशीनमध्येच अहवाल पाहता येणे व पाठविणे शक्य आहे. सध्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांना तपासणीचे प्रशिक्षण दिले जात आहे. एम्स नागपूर यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर चार ते पाच दिवसात प्रत्यक्ष स्वॅब तपासणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यातील कोरोना संशयितांना याचा लाभ होणार आहे. शिवाय कोल्हापूर येथील प्रयोगशाळेवरील स्वॅब तपासणीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com