गडहिंग्लज उपविभागात "स्वाभीमानी'ची नवी कार्यकारणी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्याचा प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून सुरू आहे. सक्रिय सभासदांची नव्याने नोंदणी करतानाच पक्ष व संघटनेच्या कार्यकारणीतही फेरबदल करण्यात आले आहेत. युवा आघाडीला गडहिंग्लज उपविभागात प्रथमच साथीला घेतले आहे. "स्वाभीमानी'चे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांना निवड पत्रांचे वितरण करण्यात आले. 

गडहिंग्लज : लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्याचा प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून सुरू आहे. सक्रिय सभासदांची नव्याने नोंदणी करतानाच पक्ष व संघटनेच्या कार्यकारणीतही फेरबदल करण्यात आले आहेत. युवा आघाडीला गडहिंग्लज उपविभागात प्रथमच साथीला घेतले आहे. "स्वाभीमानी'चे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांना निवड पत्रांचे वितरण करण्यात आले. 

गडहिंग्लज तालुका : स्वाभीमानी शेतकरी संघटना अध्यक्ष-बसवराज मुत्नाळे (भडगाव), उपाध्यक्ष- युवराज मिसाळ (लिंगनूर कसबा नूल), स्वाभीमानी पक्ष तालुकाध्यक्ष - ऍड. लक्ष्मण देवार्डे (नरेवाडी), शहराध्यक्ष- ऍड. आर. आर. चव्हाण, उपाध्यक्ष- राजू पाटील (हलकर्णी), युवा आघाडी अध्यक्ष- अजित तुरटे (तावरेवाडी). आजरा तालुका : स्वाभीमानी शेतकरी संघटना अध्यक्ष- इंद्रजित देसाई (आजरा), उपाध्यक्ष- गंगाराम डेळेकर (घाटकरवाडी), स्वाभीमानी पक्ष तालुकाध्यक्ष- भिकाजी पाडेकर (झुलपेवाडी), कार्याध्यक्ष- कृष्णात पाटील (साळगाव), उपाध्यक्ष- संजय देसाई (दाभेवाडी). युवा आघाडी अध्यक्ष- जोसेफ फर्नांडिस (पारपोली). 

चंदगड तालुका : स्वाभीमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष- जगन्नाथ हुलजी (तुडये), उपाध्यक्ष - शिवाजी भोगण (कोवाड), स्वाभीमानी पक्ष तालुकाध्यक्ष- शशिकांत रेडेकर (मलतवाडी), शहराध्यक्ष सतीश सबनीस (चंदगड), उपाध्यक्ष- पिंटू गुरव (आमरोळी), युवा आघाडी अध्यक्ष- तुकाराम ओऊळकर (कुदनूर). 

दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना निवड पत्रांचे वितरण करण्यात आले. ऍड. आप्पासाहेब जाधव यांनी स्वागत केले. स्वाभीमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, राजू पाटील, ऍड. देवार्डे, तानाजी देसाई, मनोहर दावणे, जगन्नाथ हुलजी यांची भाषणे झाली. पंचायत समिती सदस्य ईराप्पा हसुरी, सुभाष पाटील, अशोक पाटील, धनाजी पाटील, फुलाजी खैरे, आदी उपस्थित होते. 

शासनस्तरावर संवेदना कमी
सध्याचा काळ अडचणीचा आहे. शेतकऱ्यांबाबत शासनस्तरावर संवेदना कमी आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांसाठी परिस्थिती आव्हानात्मक आहे. पण, आपल्याला लढले पाहिजे. लढणे सोडून चालणार नाही. संघटनेच्या पातळीवर विद्यार्थी आणि महिला आघाडीची बांधणी केली जाणार आहे. 
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Shetkari New Team Declared In Gadhinglaj subdivision Kolhapur Marathi News