साहेब चालता येईना की ओ... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

मद्यपींना बैठका काढण्याचा दणका ; यंत्रणा आक्रमक 

कोल्हापूर - साहेब उघड्यावर कधीही दारू पिणार नाही, बैठका मारून पायात चालण्याची ताकद नाही, आता माफी करा... अशा विनवण्या मद्यपीकडून केल्या जात होत्या. राजारामपुरीसह शहरातील काही भागात सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्यांवर यंत्रणेने कारवाई केली. त्यानंतरचे हे चित्र पहावयास मिळाले. 

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी ऐकीकडे 21 दिवस देश लॉकडाऊन केले आहे. शहरात गर्दी होऊ नये, विनाकारण कोणी रस्तायावर येऊ नये यासाठी अहोरात्र पोलिस बंदोबस्त करीत आहेत. अत्यावश्‍यक सेवेला मदत करीत आहेत. दुसरीकडे आज राजारामपुरीत परिसरात काही मद्यपी गर्दी करून उघड्यावर दारू पित बसली होती. याची माहिती यंत्रणेला मिळाली. तशी ती घटनास्थळी दाखल झाली. तशी मद्यपीची तारांबळ उडाली. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यंत्रणेने तो हाणून पाडला. त्यांनी त्या मद्यपींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कडक समज देत त्यांच्या डोक्‍यावर मद्याच्या बाटल्या ठेऊन त्यांना बैठका काढण्यास सांगितले. तशा मद्यपींच्या बैठका सुरू झाल्या. कशा बशा पाच दहा बैठका झाल्यानंतर ते विनवन्या करू लागले. साहेब पाय दुखतात, गोळा आला, पुन्हा आम्ही चुकूनही दारू नाही पिणार, तरीही यंत्रणेने सांगितलेल्या बैठका मारल्या शिवाय त्यांची सुटका नाही असे ठणकावून सांगितले. तशी मद्यपींची बोलती बंद झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The system took action on public smokers in kolhapur