तैवानची जंबो पपई तुम्ही खाल्लीये का ?

the taivan papita for sale in kolhapur market and people buy papita
the taivan papita for sale in kolhapur market and people buy papita

कोल्हापूर : एरव्ही आकाराने लहान असणारी देशी पपई बाजारात येत असते, मात्र आता तैवानची जंबो पपई लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, शिवाजी मार्केट, एसटी बस स्थानक परिसरात विक्रीसाठी आलेली आहे. भले जंबो पपई असली तरी सीडलेस (बिया नसलेले) पपई चवीने गोड अन्‌ उत्कृष्ठ आहे. एक पपई खाल्ली तर एका दमात पोट भरुन जाईल. 

अनेक लोक ही पपई घेत आहेत. एरव्ही देशी पपईला नाक मुरडणाऱ्या लोकांचे लक्ष आता जंबो पपईकडे वळले आहे. अक्षरश: मोठाल्या हिरव्या रंगाच्या टरबुजाप्रमाणे हे पपई दिसते. साधारणपणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यानंतर या पपईचे वाशी (नवी मुंबई), कर्नाटक आदी भागातून आवक होत आहे. तैवानमधील असले तरी कल्चर बियाणे विक्रीसाठी मिळत असल्याने अनेक शेतकरी हे पपईचे वाण आपल्या बांधावर घेत आहेत. 

पपईच्या झाडावर खूप फळे मिळतात. यातून एकरी कितीतरी टन उत्पादन मिळते. यामध्ये आर्थिक फायदा मोठा आहे. दुसरे म्हणजे, गेल्या दोन आठवड्यापासून महाग असलेली काळी, हिरव्या द्राक्षांचे दर कमी झाले आहेत. हिरव्या द्राक्षांचे दर आता 40 रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. डाळींबाची आवक कमी असल्याने दर मात्र तुलनेने जास्त आहेत. थायलंड पेरुही आता बाजारात कमी झाला असून देशी पेरु विक्रीस उपलब्ध आहेत. 

फळांचे दर (प्रतिकिलो रुपये) 

तैवान पपई (60 रुपयाला एक नग), माल्टा संत्री (30/40/50), डाळींब (ग्रेडेशन नुसार) (180/250), चिक्कु (70/80), टरबूज (10/20), हिरवी कलिंगडे (आकारानुसार) (10/100), हिरवी द्राक्षे (40/80), काळी द्राक्षे (80/100), देशी पेरु (80/100). 

भाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये) 

लाल कांदा (40), पांढरा कांदा (50), लसूण (100/120), आंबाडा (10 रुपयाला दोन पेंड्या), ऊसावरील शेंग (60), लाल पापडी शेंग (60/70), हिरवी पापडी शेंग (60/70). 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com