पंचनामे अंतिम टप्यात ; आता मदतीची प्रतीक्षा

शामराव गावडे 
Thursday, 22 October 2020

र्वरित पंचनामे लवकरच पूर्ण केले जातील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांनी दिली.

नवेखेड (सांगली) : वाळवा तालुक्यात ७८८ हेकटरवरील नगदी पिके अवकाळीच्या पावसाने बाधित झाली आहेत.पैकी ६१२ हेकटरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण केले जातील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांनी दिली.

मागील पंधरा दिवसात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला.या अवकाळी पावसाने खरिपाचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला.सुखी जीवनासाठी पाहिलेल्या हिरव्या स्वप्नाचा चक्काचूर झाला.पोसवलेला भात वाऱ्याने भुई सपाट झाला.सोयाबीन जागेवरच कुजले.आले. हळद पिकाचे कंद पाणी साचून राहिल्याने कुजू लागले.केळी, भुईमूग याही पिकांचे मोठे नुकसान झाले.उधार  उसणवार करून पिके जोपासणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले .

हेही वाचा- दख्खनचा राजा श्री जोतिबा  देवाचा उद्या होणार जागर ; पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा -

ज्या हातांनी धान्याची रास भरायची त्या हातांनी पिकांचे अवशेष गोळा करावे लागत आहेत.साचलेले पाणी काढून द्यावे लागत आहे.शेतकऱ्याने पाहिलेली स्वप्ने साचलेल्या पाण्यात विरघळली आहेत. डोळ्यातील अश्रू डोळ्यात साचवत करभरणीला लहान मुलांना घेऊन वाफसा येऊन जमीन रब्बी साठी तयार करताना शेतकऱ्यांलां मोठा खर्च करावा लागणार आहे.नुकसान ग्रस्त पिकांना काही तरी मदत मिळेल त्यामुळे थोडासा आर्थिक हातभार लागेल अशी आशा आहे.सरकारने या पिकांच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.तलाठी,कृषी सहायक प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या पिकांचे पंचनामे करीत आहेत. कृषी विभागाची सर्व यंत्रणा या कामात गुंतली आहे.आठवड्याभरात उर्वरित पंचनामे करून प्रशासनाला सादर केले जातील.

*ऊस वगळता पिकाखालील क्षेत्र ७८८ हेकटर
*बाधित शेतकरी २३४५
*पंचनामे पूर्ण  ६१२ 
फोटो ओळी
नवेखेड : वाळवा तालुक्यात बाधित पिकांचे पंचनामे करताना  कृषी व महसूल विभागाचे अधिकारी.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taluka Agriculture Officer Bhagwan Mane information Punchnama on 612 hectares has been completed