esakal | आरटीपीसीआर चाचणीनंतरच शिक्षकांना शाळांमध्ये प्रवेश 
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers Are Allowed To Teach In Schools Only After RTPCR Test Kolhapur Marathi News

शहरी व ग्रामीण भागात इयत्ता सातवीपर्यंतचे वर्ग हे प्राथमिक शाळांना जोडले आहेत. त्यामुळे बुधवार (ता.27) पासून सुरू होणाऱ्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये या प्राथमिक शाळांचा प्रश्‍न भेडसावणार आहे.

आरटीपीसीआर चाचणीनंतरच शिक्षकांना शाळांमध्ये प्रवेश 

sakal_logo
By
ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : शहरी व ग्रामीण भागात इयत्ता सातवीपर्यंतचे वर्ग हे प्राथमिक शाळांना जोडले आहेत. त्यामुळे बुधवार (ता.27) पासून सुरू होणाऱ्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये या प्राथमिक शाळांचा प्रश्‍न भेडसावणार आहे. नववी ते बारावीचे वर्ग सुरू होताना माध्यमिक शाळेतील शिक्षकांची कोरोना चाचणी झाली. मात्र आता सातवीपर्यंत प्राथमिक शाळातील शिक्षकांना आरटीपीसीआर कोरोना चाचणीनंतर शाळांमध्ये प्रवेश असणार आहे. अन्यथा "नो एन्ट्री'चे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

हातकणंगले तालुक्‍यातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या प्राथमिक शाळांतील सुमारे 430 शिक्षकांना बुधवारी शाळेत येणार नाही. केवळ शंभर टक्के निरोगी असणाऱ्या शिक्षकांना प्रवेश असणार आहे. मधुमेह, उच्चरक्तदाब या आजाराने त्रस्त असलेले शिक्षक व पन्नास वर्षांवरील शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. यासाठी इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय, संजय घोडावत विद्यापीठ, ग्रामीण रुग्णालय हातकलंगले याठिकाणी कोरोनाचाचणीची सोय करण्यात आली आहे. 

इयत्ता पाचवी ते आठवीचा शाळा प्रजासत्ताक दिनानंतर सुरू करण्यासाठी शाळांची तयारी जोरात आहे. पालकांकडून संमतीपत्र आधीच घेऊन आजारी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नसल्याच्या सक्त सूचना दिले आहेत. शाळांसाठी विद्यार्थ्यांची दररोज तपासणी, एका बाकावर एकच विद्यार्थी, एक दिवसाआड वर्ग हे नियम बंधनकारक केले आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरणासह प्रथम प्राधान्य दिले आहे. प्राथमिक शाळातील शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे नियोजन केले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur