Tehsildar of Raibag Chandrakant Bajantri  Suspended
Tehsildar of Raibag Chandrakant Bajantri Suspended

रायबागचे तहसीलदार चंद्रकांत बजंत्री निलंबित

रायबाग (बेळगाव) : रायबागचे तहसीलदार चंद्रकांत बजंत्री यांना निलंबित करण्यात आले आहे. कोरोना खर्चात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कुडचीचे आमदार पी. राजीव यांनी विधानसभेत गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. बजंत्री यांच्या जागी रायबागचे तहसीलदार म्हणून एन. बी. गेज्जी यांची नियुक्ती केली आहे.


कोरोना काळात व्यवस्थापनासाठी दिलेल्या रक्कमेमध्ये गैरवापर केल्याच्या आरोप तहसीलदार चंद्रकांत बजंत्री यांच्यावर करण्यात आला होता. कोरोनात खर्च केलेला पैसा आणि टास्क फोर्स समितीच्या मंजुरीशिवाय केलेला खर्च यावरून विधानसभेच्या अधिवेशनात आमदार पी. राजीव यांनी प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती. त्यावर अधिवेशनात चर्चाही झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी चिक्कोडी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.  चौकशी अहवालानुसार तहसीलदार चंद्रकांत बजंत्री यांना महसूल विभागाच्या अवर सचिव आर. उमादेवी यांनी निलंबन केले आहे. 

तहसीलदार चंद्रकांत बजंत्री हे नेहमीत चर्चेतील अधिकारी आहेत. रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्याशी यांचा संघर्ष रंगला होता. त्यातूनच बदली होऊन रात्री तहसीलदारांना निवासस्थान सोडावे लागले होते. त्यावरून हा वाद खूप चर्चेत आला होता. आता निलंबनाची कारवाई झाल्याने त्याबाबत तालुक्यात पुन्हा चर्चेचे वादळ निर्माण झाले आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com