Telemedicine service of senior doctors for effective treatment of corona infestation
Telemedicine service of senior doctors for effective treatment of corona infestation

कोरोना बाधितावर प्रभावी उपचारासाठी ज्येष्ठ डॉक्‍टरांची टेली मेडिसिन सेवा

कोल्हापूर ः जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांवर प्रभावी उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी अनुभवी डॉक्‍टरांकडून टेली मेडिकल कम्युनिकेशनव्दारे मदत घेतली जाणार आहे. ज्या रुग्णांना गुंतागुतीचे आजार आहेत. तसेच कोरोनाची बाधा झाली आहे, अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना हे वरिष्ठ डॉक्‍टर मार्गदर्शन करतील. त्यासाठी जिल्ह्यातील जवळपास 24 डॉक्‍टरांची तालुकानिहाय नियुक्ती केली आहे. 
गेल्या दोन महिन्यांत कोरोनाबाधित आढळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातील बहुतांशी रुग्णावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय प्रत्येक तालुक्‍यात अलगीकरण कक्षातही काही कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी शासकीय रुग्णालयाकडील एमबीबीएस, एमडी डॉक्‍टर उपचार करीत आहेत. अशात अनेक कोरोनाबाधितांना मधुमेह, हृदय विकार, पोट विकार, किडणी विकार, फुप्फुसाचे विकार यापैकी काही आजार आहेत. या शिवाय कोरोनापॉझिटिव्हही आहेत. अशा रुग्णावर उपचार करताना उपचाराची दिशा ठरवणे मुश्‍कील होते. कधी रात्री अपरात्री रुग्णाची प्रकृती बिघडते, अशा वेळी अन्य विषयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून वैद्यकीय उपचार संदर्भ घेऊन उपचार करण्याला प्राधान्य देता येणे शक्‍य व्हावे, यासाठी जिल्ह्यातील अनुभवी खासगी व शासकीय डॉक्‍टरांची मदत घेतली जाणार आहे. 
ज्या रुग्णालयात कोरोनाबाधित उपचार घेत आहे. तेथील डॉक्‍टर गरजेनुसार या अनुभवी डॉक्‍टरांना फोनव्दारे संपर्क करून रुग्णावर उपचारविषयी औषध, ऑक्‍सिजन पुरवठा, अतिदक्षता, लक्षणावर नियंत्रण मिळविण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी माहिती विचारतील त्यानुसार अनुभवी डॉक्‍टर टेली कम्युनिकेशन व्हाटस अप, मेल अथवा व्हिडिओ कॉलव्दारे उपचारबाबत मार्गदर्शन करतील. प्रत्येक तालुक्‍यात किमान 3 ते 6 डॉक्‍टरांची नियुक्ती केली आहे. वरील सोय पालक मंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अवाहनानुसार केली आहे. 

टेलिमेडिसिनसाठी उपलब्ध डॉक्‍टरर्स ः 
कोल्हापूर शहर ः डॉ. वैजयंती दिवसे, डॉ. अभय आरगे, डॉ. विजय हिराणी, डॉ. डी.जी. शितोळे. करवीर ः डॉ. वरुण देवकाटे, प्रकाश आळसे. राधानगरी ः डॉ. अनिता परितेकर. पन्हाळा ः जयवंत पाटील. कागल ः डॉ. नवनाथ मगदूम, हातकणगंले ः डॉ. आय. एस. पठाण , डॉ. अनुष्का वाईकर, डॉ. अमित जोशी, डॉ. अभय कुडचे. इचलकरंजी ः डॉ. गिरीश पाटील, डॉ. सी. पी. पाटील डॉ. प्रवीण मोरे. शिरोळ ः डॉ. दिलीप जोशी, डॉ. बोरगावे, भुदरगड ः डॉ. रमेश भोई, डॉ. बिपिन गोंजारी. शाहूवाडी ः डॉ. साई प्रसाद, डॉ. जयवंत पाटील, गडहिंग्लज ः डॉ. योगेश बिरजे, डॉ. चंद्रशेखर देसाई, चंदगड ः डॉ. इंगवले, डॉ. वरून बाफना, गगनबावडा ः डॉ. संजय देसाई, आजरा ः डॉ. किरण पाटील डॉ. प्रकाश साळवे. 

संपादन ः यशवंत केसकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com