धागा धागा जोडत त्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले दहा हजार ; पालकमंत्र्यांकडून कौतुक ​

Ten thousand to the Chief Minister's Assistance Fund from thane sasne family in gadmudshingi
Ten thousand to the Chief Minister's Assistance Fund from thane sasne family in gadmudshingi

कोल्हापूर : कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. कोणालाच काही करता येत नाही. पण माझा टेलरिंगचा व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे, माझे पोट भरले आहे. आता कोरोनाविरुध्द लढण्यासाठी शासनाला म्हणजेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा हजार रुपये देत असल्याची भावना गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या वसंत रामचंद्र सासने यांनी आज व्यक्त केली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या मदतनिधीचा धनादेश दिला. यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप झांबरे उपस्थित होते. 

अपंगत्वावर मात करत गडमुडशिंगी येथे श्री सासणे यांचा टेलरिंग व्यवसाय आहे. लॉकडाऊनमूळे सर्व व्यवसाय बंद आहेत. पण सासने यांनी घरीच राहून आपला टेलरिंगचा व्यवसाय केला. यातून स्वत:साठी आवश्‍यक असणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तू घेवून उर्वरित रक्कम कोरोनासाठी राज्यभर केल्या जाणाऱ्या उपाययोजनेला हात भार म्हणून त्यांनी आपल्या कमाईतील दहा हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत.

अपंग असतानाही टेलरिंग व्यवसाय : पालकमंत्र्यांकडून कौतुक ​

जगासह देश आणि महाराष्ट्रवरही कोरोनाचे मोठे संकट आहे. प्रत्येकाने आपआपल्या ताकदीने शासनाला मदत केली पाहिजे. हाच आदर्श हेतू ठेवून सासने यांनी मदत निधी दिला आहे. याला त्यांची पत्नी लतादेवी सासणे यांनीही प्रोत्साहन दिले. श्री सासने यांनी दिलेल्या दहा हजार रुपयांच्या मदतीशिवाय लोकांना मोफत मास्कही वाटप करुन सामाजिक कार्य केले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. 

हेही वाचा- मोडीच्या मूडमध्ये हजार जण ! -

टेलरिंग व्यवसायातून जेवढी रक्कम मिळाली ती रक्कम कोरोना प्रतिबंध करण्यासाठी वापरली जाईल. श्री सासने यांच्यासारख्या कष्टाळू आणि सामाजिक भान असणाऱ्या लोकांनी मदतीसाठी समोर आले पाहिजे. 
सतेज पाटील पालकमंत्री, कोल्हापूर 
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com