esakal | फास्टफुडचा नाद नडला, साडेदहा लाखाला गंडला
sakal

बोलून बातमी शोधा

theft in belgaum rupees 10 lakh from one businessman within a time in belgaum

रात्री नऊच्या दरम्यान अवघ्या पंधरा मिनिटात शहापूर बँक ऑफ इंडियान जीकच्या संगम गारमेंट दुकानासमोरील एमएफ डबल रोडवर ही घटना घडली

फास्टफुडचा नाद नडला, साडेदहा लाखाला गंडला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : रस्त्याच्याकडेला कार उभी करून फास्टफूड दुकानात गेलेल्या व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून सुमारे साडेदहा लाख रुपयांचे सोनाचे दागिने पळविण्यात आले. काल मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान अवघ्या पंधरा मिनिटात शहापूर बँक ऑफ इंडियान जीकच्या संगम गारमेंट दुकानासमोरील एमएफ डबल रोडवर ही घटना घडली आहे. या प्रकरणी  संतोष राजशेखर मगदूम (वय 36, रा. संकेश्वर ता. हुक्केरी) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 

हेही वाचा - जुनेच दिग्गज मैदानात ; आता शिवसेना होणार आक्रमक -

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी संतोष हे सोन्याचे व्यापारी आहेत. काल सायंकाळी 7.30 च्या सुमारास ते एमएच 14 इसी 5816 या नॅनो कारमधून बेळगावला आले होते. शहापूर तेली पाटील गल्लीतील डी. के. हेरेकर जेलर्स दुकान आणि शहापूर दाणे गल्लीतील मिथुन पावसकर यांच्या लक्ष्मी नेकलेस दुकानात नवीन तयार करण्यात आलेले सोन्याचे दागिने घेऊन ते समोरील बाजूच्या शीट खाली ठेऊन पुन्हा गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. 

हेही वाचा -  अजित पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

रात्री 9 च्या दरम्यान शहापूर येथील बँक ऑफ इंडियानजीकच्या संगम गारमेंट कापड दुकानासमोरील एमएफ डबल रोडवर आपली कार उभी करून फास्ट फूड दुकानात गेले होते. त्यानंतर ते 9.15 सुमारास कारनजिक आले असता कारची काच फोडून चोरट्यांनी शीट खालील सुमारे साडेदहा लाख रुपये किमतीचे दागिने पळविल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती शहापूर पोलिसाना दिली. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेतली पंचनामा केला.

संपादन - स्नेहल कदम