चोरट्यांची हद्द; ओपन जिमच्या साहित्याची चोरी

Theft of open gym materials in kolhapur
Theft of open gym materials in kolhapur

टेंबालईवाडी (कोल्हापूर) : ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच व्यायाम करणाऱ्यांसाठी असलेल्या ओपन जिममधील साहित्य मोडून ते गायब करण्याचा प्रकार शाहू जलतरण तलवानजीक असणाऱ्या बागेमध्ये घडला आहे. इतकेच नाही तर संरक्षक कठड्यावर असणाऱ्या लोखंडी जाळ्याही गायब आहेत. गेट बंद असूनही या उद्यानात दिवसभर मद्यपींचा ठिय्या असतो. अशा या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या उद्यानात फिरायचे कसे, असा सवाल येथील नागरिक करत आहेत. 

राजारामपुरी एक्‍सटेन्शन परिसरातील असणाऱ्या शाहू जलतरण उद्यानामध्ये ओपन जिम आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गासाठी आपला फिटनेस सांभाळण्यासाठी या ओपन जिमचाच मोठा आधार आहे. असे असताना या बागेतील जिमचे साहित्य तोडून टाकले आहे. हे तोडलेले साहित्य या परिसरात उपलब्ध नसल्यामुळे हे तोडलेले साहित्य नेमके गेले कुठे हा प्रश्न अनुत्तरित आहे. या सोबतच आजूबाजूच्या परिसरातील काही टवाळखोर येथे बसून मद्य प्राशन करत बसत असल्याचे चित्र आहे. तसेच या बागेमध्ये फिरायला येणाऱ्या तसेच व्यायामासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी हटकल्यास त्यांच्याशी हुज्जत घालण्याचे प्रकारही घडले आहेत. अनेक वेळा निव्वळ मस्तीपोटी या जिमच्या साहित्यास नुकसान पोचवले आहे. यामुळे या साहित्याचा वापर करताना अपघाताने गंभीर इजा होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. परिसरात असणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था आहे. या ठिबक सिंचनाच्या पाइपलाच छिद्र पडून त्यातून येणाऱ्या पाण्याचा वापर दारूच्या ग्लासमध्ये केला जातो. या जिममध्ये लेग प्रेस, चेस्ट प्रेस, बेली ट्‌विस्टर, लेग ट्‌विस्टर, आर्म रोलर, पुल्सअप बार, पुशअप्स टेबल, वॉकर असे साहित्य आहे. हे साहित्य बसवल्यापासून या परिसरातील नागरिक याचा मोठ्या संख्येने वापर करतात. रोज सकाळी आणि संध्याकाळी या बागेमध्ये वॉकिंग ट्रॅकवर चालनाऱ्यांची तसेच व्यायाम कारणाऱ्यांची नित्याची गर्दी असते. या साहित्याची अनेक ठिकाणी नासधूस केली आहे. अनेक पाईप तोडून नेल्या आहेत. विशेष म्हणजे या उद्यानाची देखरेख करण्यासाठी आणि निगराणी ठेवण्यासाठी कोणीही नसते. उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या कठड्यावरील लोखंडी ग्रीलही तोडून गायब केल्या आहेत. 


या परिसरामधील हे एकमेव उद्यान आहे. या उद्यानाचा वापर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक होतो. मात्र, या उद्यानामध्ये घडणाऱ्या प्रकारामुळे उद्यानाचे स्वास्थ्य धोक्‍यात आले आहे. बरेचशे साहित्य गायब झाले आहे. उद्यानात पहारेकरीची आवश्‍यकता आहे. 
नितीन कामत, नागरिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com