कोल्हापूर जिल्ह्यात बर्ड फ्लू नाही; खा चिकन, अंडी!

शिवाजी यादव
Monday, 25 January 2021

कोल्हापूर ः जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू आढळलेला नाही, तरीही खबरदारीचा भाग म्हणून अंडी, चिकन मांस पूर्ण शिजवून खावे, तसेच राज्यातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्लू आढळला आहे. मात्र, कोल्हापुरात कुठेही आढळलेला नाही. तरीही पशुसंवर्धन विभाग सतत पाहणी करीत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

कोल्हापूर ः जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू आढळलेला नाही, तरीही खबरदारीचा भाग म्हणून अंडी, चिकन मांस पूर्ण शिजवून खावे, तसेच राज्यातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्लू आढळला आहे. मात्र, कोल्हापुरात कुठेही आढळलेला नाही. तरीही पशुसंवर्धन विभाग सतत पाहणी करीत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
दोन महिन्यांपूर्वी परराज्यांत बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे अनेक पक्ष्यां मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपूर्वी बर्ड फ्लूची लागण कोंबड्यांना झाल्याच्या अफवा उठल्या. त्यानंतर अनेकांनी चिकन, अंडी खाणे बंद केले. परिणामी, पोल्ट्री फार्म, चिकन विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. दोन महिन्यांपासून पुन्हा बर्ड फ्लूची चर्चा सुरू झाली, त्यानंतरही चिकन, अंडी, मांस व्यवसायावर परिणाम होण्याची वेळ आली. मात्र, बर्ड फ्लू कोठे आहे का, याची पाहणी केली. मात्र, बर्ड फ्लू कोठेही आढळलेला नाही. 
रंकाळ्याजवळ दोन पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले. त्यांना बर्ड फ्लू नाही. जिल्ह्यातील साडेपाचशेवर कोंबड्यांची स्वॅब तपासणी केली. त्यातील एकही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. वरील सर्व पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभाग जिल्ह्यातील पोल्ट्री तसेच चिकन विक्रेत्यांना खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करीत आहे. त्यामुळे सध्या तरी बर्ड फ्लूचा धोका दिसत नाही. त्यामुळे चिकन, अंडी खरेदी करण्यास हरकत नाही. मात्र, खबरदारीसाठी चिकन, अंडी चांगल्या प्रकारे शिजवून खावीत, असे आवाहन डॉ. पठाण यांनी केले आहे. या वेळी अंडी उबवणी केंद्राचे उपायुक्त सुभाष नाईक, पशुसंवर्धन पर्यवेक्षक डॉ. सॅम लुड्रीक्‍स उपस्थित होते. 

 
चिकन, अंड्यांचा दर होणार निश्‍चित 
शेतकऱ्यांकडून 50 ते 70 रुपयांना कोंबडी खरेदी करून ते चिकन म्हणून 160 ते 200 रुपये किलोने विक्री केले जाते. दरातील तफावत दूर व्हावी, ग्राहकाला किफायतशीर दरात चिकन मिळावे, तसेच कुक्‍कुटपालकालाही चांगला भाव मिळावा, यासाठी रेडिरेकनरच्या धर्तीवर भाव निश्‍चित करण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभाग करीत आहे, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले. 

संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no bird flu in Kolhapur district; Eat chicken, eggs!