CoronaVirus : सलूनमध्ये मास्क लावल्याशिवाय कटिंग-दाढी नाहीच...

There is no cutting-beard without wearing a mask in the salon in kolhapur marathi news
There is no cutting-beard without wearing a mask in the salon in kolhapur marathi news

कोल्हापूर : सलूनमध्येही कोरोनाची धास्ती वाढली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सलूनमध्ये पावडर आणि इतर सौंदर्यप्रसाधनाबरोबरच सॅनिटायझर आणि मास्क दिसून येत आहेत. प्रत्येक ग्राहकासाठी स्वतंत्र रुमाल वापरले जात आहेत.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी व्हॉटस्‌ ॲप आणि सोशल मीडियावरून दुकानदारांना सावधानतेचा इशारा आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देऊन जनजागृती केली आहे.

सौंदर्यप्रसाधनाच्या ठिकाणी सॅनिटायझर

जिल्ह्यात सुमारे साडेनऊ हजार सलून दुकाने आहेत तर शहरात सुमारे अकराशे दुकाने आहेत.  प्रत्येक दुकानात कमीत कमी दहा व्यक्ती रोज दाढी करतात. याचा विचार केला तर कोरोनाबाबत सर्वाधिक जनजागृती सलून दुकानातून होणे आवश्‍यक आहे. यासाठी नाभिक महामंडळाच्यावतीने जनजागृती सुरू झाली आहे. यामध्ये प्रत्येकाने मास्क लावून काम करावे, एक कटिंग किंवा दाढी झाली की स्वच्छ पाण्याने हात धुवावेत, सर्व हत्यारे निर्जंतुक करून वापरावेत, दुकानातील सर्व टॉवेल्स्‌, नॅपकिन्स्‌ स्वच्छ ठेवावेत, दुकानात जास्तीत जास्त काम होणारी जागा स्वच्छ ठेवावी, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आले आहे.

 निर्जंतुकीकरणावर भर

अध्यक्ष श्रीकांत झेंडे, उपाध्यक्ष सतीश चव्हाण, सचिव राहुल टिपुगडे यांच्या माध्यमातून ही जनजागृती सुरू केली आहे.सध्या सर्वच सलून दुकानात दाढी करण्यापूर्वीच मास्कचा वापर केला जात आहे. ज्या ठिकाणी सौंदर्य प्रसाधने ठेवली जातात तेथे सॅनिटायझर ठेवल्याचे दिसून येते. दाढी करतानाही प्रत्येक ग्राहकाला स्वतंत्र नॅपकिन वापरण्यावर भर दिला जात आहे. 

सोशल मीडियावरून जनजागृती

जिल्ह्यातील सलूनमध्ये किमान दिवसाला लाख व्यक्ती येतात. त्यांची आणि दुकानदारांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही व्हॉटस्‌ ॲपसह सोशल मीडियावरून जनजागृती सुरू ठेवली आहे. प्रत्येकाला फोनवरून संपर्क साधून मास्क वापरण्याची सक्ती करीत आहोत. तसेच ग्राहकाच्या हितासाठी सर्व हत्यारे, रुमाल यांचेही निर्जंतुकीकरण केले जात आहे.
-सयाजी झुंजार, जिल्हाध्यक्ष ः महाराष्ट्र नाभिक महामंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com