कोल्हापुरातील या गावांना ऐन पावसाळ्यात करावा लागतो पाणी टंचाईचा सामना  

These villages in Kolhapur have to face water scarcity during monsoons
These villages in Kolhapur have to face water scarcity during monsoons

कोल्हापूर : जिल्ह्यात जोरदार पावसामुळे महापूर येतो. पुराच्या पाण्यात पाणी पुरवठा करणारे वीज पंप बुडतात, वीज पुरवठा खंडीत होतो, या आणि अशा अनेक कारणामुळे ऐन पावसाळ्यातच भोगावती आणि पंचगंगाकाठावरील 10 ते 15 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. 

जिल्ह्यात जस-जसे पुराचे पाणी गावात शिरू लागते, तसे पाण्याची टंचाई जाणवू लागते. लोकांना पाऊस झेलतच पाण्यासाठी वनवण करावी लागते. जिल्ह्यातील वीस ते बावीस गावांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते, अशी परिस्थिती आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. काही ग्रामपंचायतींची पाण्यातील मोटर आहे. पुरामूळे डीपी पाण्याखाली जातात. पाणी पुरवठा करणाऱ्या वीज पंपासाठी स्वतंत्र वीज जोडणी असते. पण, ग्रामपंचायतींकडून वीजपंप सुरु करण्याचे बटण किंवा फ्युज या कमी उंचीवर ठेवल्यामूळे पाण्यात बुडतात. त्यानंतर पाणी पुरवठा बंद होतो. याशिवाय, त्याचा नंतर खर्चही वाढतो. त्यामुळे महे, बीड, कोगे, शिरोली, बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूरसह भोगावतील नदीवरील बुसंख्य गावांना पुराच्या पाण्यामुळे टंचाईच्या झळा सहन कराव्यात लागतात. ऐन पावसाळ्यात स्वच्छ आणि मुबलक पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. ग्रामपंचातींच्या पातळीवर पावसाळ्यातही पाणी पुरवठा सुरळीत होईल, याचे नियोजन करावे लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करताना पाणी शुध्दीकरण केले जाते. पण पाणी पुरवठाच बंद होतो. त्यामुळे लोकांना केवळ कापडाने गाळण करुनच तेच पाणी प्यावे लागते. 

पावसाळ्यात पाणी पुरवठा बंद होतो. यामध्ये उंचावर डीपी बसवणे किंवा पाण्यातील वीजपंप बसवणे हाच एक पर्याय आहे. ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर लोकांना अस्वच्छ आणि गढूळ पाणी प्यावे लागते. हे वास्तव आहे. 
-एक नागरिक, करवीर तालुका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com